राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्सच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त शिलाई मशीनचे वाटप
By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST
नाशिक : इलेक्ट्रॉनिक्स होम ॲप्लायन्सेसमध्ये गेल्या ३० वर्षांपासून अविरत कार्यरत असलेले मे. राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स यांचा २४ जुलै रोजी ३० वा वर्धापनदिन आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही चार कॉम्प्युटर, तीन शिलाई मशीन, तीन तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संचालक राजेंद्र पारख यांनी दिली.
राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्सच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त शिलाई मशीनचे वाटप
नाशिक : इलेक्ट्रॉनिक्स होम ॲप्लायन्सेसमध्ये गेल्या ३० वर्षांपासून अविरत कार्यरत असलेले मे. राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स यांचा २४ जुलै रोजी ३० वा वर्धापनदिन आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही चार कॉम्प्युटर, तीन शिलाई मशीन, तीन तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संचालक राजेंद्र पारख यांनी दिली.गेल्या १७ वर्षांपासून ते वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा करतात. यापूर्वी त्यांनी गरजूंना तीनचाकी सायकल, कॉम्प्युटर, अंध व्यक्तींना कुसुमाग्रजांच्या हस्ते अभ्यासाच्या टेप-कॅसेटचे वाटप, अपंग गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप केलेले आहे. तसेच जयपूर फूट शिबिरात आपले योगदान दिलेले आहे. या शिवाय गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी ते अंध-अपंगांचा वधू-वर परिचय मेळावा घेतात. त्यातून ५-६ विवाह जमतात व त्यातील विवाहांसाठीही ते सहाय्य करतात.यंदा ते वापरलेले कॉम्प्युटर, शिलाई मशीन, तीनचाकी सायकलचे वाटप गरजूंना करणार असून २४ जुलै रोजी सायं ५ वा. लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. अर्ज देण्याचे ठिकाण : राजेंद्र पारख - पारख इलेक्ट्रॉनिक्स, नंदलाल पारख - पारख एन्टरप्रायजेस, रवींद्र पारख - पारख ॲप्लायन्सेस. कार्यक्रमाचे ठिकाण - पारख इलेक्ट्रॉनिक्स, विकास भुवन, दुर्गा माता मंदिरासमोर, कॅम्परोड, नाशिकरोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.