शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या कारकीर्दीत सीबीआयचे स्वत:शीच युद्ध, राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 04:58 IST

मोदी सरकारकडून राजकीय सूड उगविण्यासाठी सीबीआयचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. पण आता या संस्थेची रया जाण्याची वेळ आली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून राजकीय सूड उगविण्यासाठी सीबीआयचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. पण आता या संस्थेची रया जाण्याची वेळ आली आहे. सीबीआयचे स्वत:शीच युद्ध सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात एका लाच प्रकरणात सीबीआयनेच गुन्हा नोंदविला आहे. त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांचे लाडके तसेच गुजरात केडरमधील आणि गोध्रा विशेष तपास पथकात कामगिरी बजावलेले अधिकारी अशी राकेश अस्थाना यांची ओळख आहे. सीबीआयमध्ये संचालकांनंतर त्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. अशा व्यक्तीवरच आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सीबीआयच्या विशेष संचालकपदी अस्थाना यांची नियुक्ती केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी कठोर टीका केली होती. बीफ निर्यात करणारा व्यापारी मोईन कुरेशी हा मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात गुंतला आहे. त्यातून सुटका करण्यासाठी त्याच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच अस्थाना यांनी घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सीबीआयने १५ आॅक्टोबर रोजी गुन्हा नोंदविला.>अंतर्गत स्पर्धेतून तर कारवाई झाली नाही ना?सीबीआयच्या अधिकाºयांमधील अंतर्गत स्पर्धेमुळे अस्थानांवर कारवाई झाली नाही ना, असाही संशय अनेकांनी बोलून दाखविला आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पोलीस अधिकारी असलेल्या अस्थानांची त्यांच्याशी विशेष जवळीक होती. गोध्रासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या विशेष तपास पथकात असलेल्या अस्थाना यांनी बजावलेल्या कामगिरीवर त्यावेळी मोदी अतिशय खुश होते. मग आताच नेमके असे काय झाले की त्यांच्यावर कारवाईची कुºहाड उगारण्यात आली याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी