शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भागीदार असल्याचा आरोप म्हणजे माझ्यासाठी बक्षीसच, मोदींचा राहुल यांना नाव न घेता टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 21:09 IST

पंतप्रधानांनी नाव न घेता राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.

लखनऊ- पंतप्रधान आवास योजनेला आज तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं लखनऊमध्ये एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला होता. यावेळी मोदींनी विकासाच्या योजना जनतेला सांगतानाच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.मी चौकीदार नसून भागीदार असल्याचा माझ्यावर काही जणांनी आरोप केला आहे. हा आरोप म्हणजे माझ्यासाठी बक्षीसच आहे. कारण देशाच्या विकासात मी भागीदार आहे. मला गर्व आहे की, घाम गाळणारे मजूर, दुःखी मातेचा मी भागीदार आहे.मी सियाचीनच्या जवानांचा आणि देशातील शेतक-यांचा भागीदार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राफेल घोटाळ्यावरून राहुल गांधींनी मोदी चौकीदार नव्हे, तर भागीदार असल्याचा आरोप केला होता. त्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींनाही उजाळा दिला.विविध योजनांच्या माध्यमांतून तीन वर्षांत झालेला शहरी विकासाचीही मोदींनी जनतेला माहिती दिली. ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मी योगी सरकारचा आभारी आहे. यापूर्वीच्या सरकारला प्रत्येक वेळी पत्र लिहावं लागत होतं. परंतु काही लोक कामच करू इच्छित नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या बंगल्याची सजावट करायची होती. त्यातून त्यांना वेळच मिळत नव्हता, असं म्हणत मोदींनी यापूर्वीच्या अखिलेश सरकारवरही हल्लाबोल केला.2022पूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे घर असावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने शहरांमध्ये आतापर्यंत 54 लाख घरं, तर ग्रामीण भागातील जनतेच्या 1 कोटींपेक्षा अधिक घरांना मंजुरी दिली आहे. कोट्यवधी जनतेचे भवितव्य सुरक्षित बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो तीन वर्षांनंतर बळकट झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत माता-भगिनींच्या नावावर घरे दिली जात आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास 87 लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावावर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी