शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अलाहाबाद उत्तर विधानसभा निवडणूक करा रद्द; काँग्रेस उमेदवाराची आयोगाकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:03 IST

शरद गुप्ता  लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : १९७५ मध्ये ज्या आधारावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेलीतील निवड ...

शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : १९७५ मध्ये ज्या आधारावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेलीतील निवड रद्द ठरविली होती त्या आधारावर अलाहाबाद उत्तरची निवडणूक रद्द ठरवावी अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २५५ जागा जिंकल्या. अलाहाबाद उत्तर मधून भाजपाचे हर्षवर्धन बाजपेयी यांनी सपाचे संदीप यादव यांचा ५५ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार अनुग्रह नारायण सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि त्यांचे एक समर्थक रिंकू यादव यांनी निवडणूक आयोगाकडे एमआयएमचे उमेदवार मोहम्मद अली यांच्याविरुद्ध कायद्याच्या कलम १३४ नुसार प्रकरण दाखल केले आहे. माजी आमदार अनुग्रह सिंह यांनी याचिकेत आरोप केला आहे की, मोहम्मद अली यांचे मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आलेले सुनील कुमार द्विवेदी आणि शानू भट्ट हे दोघेही योगी आदित्यनाथ सरकारमध्ये सरकारी वकील नियुक्त करण्यात आले होते. तर, अन्य एक प्रतिनिधी आशुतोष शुक्ला प्रयागराजच्या माध्यमिक विद्यालयात सहायक शिक्षक आहेत. कायद्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यास कोणत्याही पक्षाचा निवडणूक एजंट, पोलिंग एजंट अथवा मतमोजणी प्रतिनिधी होता येत नाही. असा दुरुपयोग सिद्ध झाल्यास निवडणूक रद्दही होऊ शकते. 

हे दिले उदाहरण... अलाहाबाद हायकोर्टाने जनता पार्टीचे उमेदवार राज नारायण यांच्या याचिकेवर निर्णय देताना इंदिरा गांधी यांची निवड रद्द ठरविली होती. कारण, निवडणूक एजंट बनविण्यात आलेले यशपाल कपूर यांचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडून तोपर्यंत मंजूर झालेला नव्हता.  अनुग्रह नारायण सिंह यांनी सात अशा व्यक्तींची माहितीही दिली आहे जे भाजप कार्यकर्ते असूनही एमआयएमचे एजंट म्हणून काम करत होते. 

टॅग्स :Electionनिवडणूक