शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अलाहाबाद हायकोर्टच्या न्यायमूर्तीवर गुन्हा दाखल; वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूने निकालाचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 02:12 IST

शुक्ला हे उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती आहेत.

नवी दिल्ली : वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिल्याचा आरोप असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आणि लखनौतील त्यांच्या निवासस्थानी छापेही टाकले, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.शुक्ला हे उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती आहेत. सीबीआयने याचप्रकरणी छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आय. एम. कुद्दुसी, प्रसाद एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भगवान प्रसाद यादव, पालाश यादव आणि खासगी व्यक्ती भावना पांडे व सुधीर गिरी यांच्यावरही गुन्हा दाखल केला.‘न्यायमूर्ती श्री नारायण शुक्ला यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून गुन्हेगारी कटात प्रवेश केला आणि बी. पी. यादव व पालाश यादव यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी फायदा घेतला’, असे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे. ट्रस्ट लखनौत वैद्यकीय महाविद्यालय चालवते. २०१७ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीच्या समुपदेशन सत्रातून महाविद्यालयाला वगळण्यात येऊ नये म्हणून तसा आदेश काढण्यासाठी शुक्ला यांंनी फायदा घेतला.शुक्ला यांनी गैरवर्तन केल्याची माहिती मिळाल्याच्या आधारावर केल्या गेलेल्या प्राथमिक चौकशीवरून सीबीआयने ८ सप्टेंबर, २०१७ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर खळबळ उडाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांंनी यावर्षी जुलैमध्ये शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिल्यावर शुक्ला यांच्यावर चार डिसेंबर, २०१९ रोजी सीबीआयने नव्याने गुन्हा दाखल केला. शुक्ला आणि इतरांच्या केलेल्या प्राथमिक चौकशीची माहिती सीबीआयने गोगोई यांना दिली होती. तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निदर्शनास ते प्रकरण (शुक्ला यांचे गैरवर्तन) आणल्यानंतर त्यांनी प्राथमिक चौकशी सांगितली होती. सीबीआयने शुक्ला यांच्यावर नियमित खटला चालवण्यासाठी परवानगी मागताना प्राथमिक चौकशीवरील छोटी टिप्पणी घटनाक्रमासह सरन्यायाधीशांपुढे ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीवर गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली गेल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे हा अधिकारी म्हणाला.

टॅग्स :Courtन्यायालय