शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

संदीप घोष यांच्या फोनमधून सगळे उघड होणार; सीबीआय या प्रकरणाचा आणखी तपास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:31 IST

कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील महिला डॉक्टर हत्या प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या मोबाईलची चौकशी सुरू आहे.

कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरची अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने आता माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी सीबीआयने आरोपीची कसून चौकशी केली. 

'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप

प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी सकाळी सेमिनार रूममध्ये आढळल्यानंतर लगेचच झालेल्या मोबाईल फोन कॉल्सचा सीबीआय ट्रॅक करत आहे. घोष यांनी केलेले फोन कॉल्स ट्रॅक करून तपास अधिकारी त्या कॉल्सवरील संभाषणांमध्ये नेमके काय झाले याची चौकशी सुरू आहे.

माजी प्राचार्य संदीप घोष यांनी हत्या झाली त्यादिवशी कोणा कोणाला फोनवरुन संपर्क साधला याची चौकशी करत आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येबाबत कोणाला काही माहिती दिली होती किंवा कोणाला सूचना दिल्या होत्या. याचाही तपास करणार आहेत. 

सीबीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोष यांची पॉलीग्राफ चाचणी केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने कोलकाता पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक अनुप हलदर आणि या प्रकरणातील एकमेव आरोपी संजय रॉयचा जवळचा सहकारी यांच्यावर हीच चाचणी घेण्यासाठी कोलकाता ट्रायल कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोष यांची पॉलीग्राफ चाचणी केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने कोलकाता पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक अनुप हलदर आणि या प्रकरणातील एकमेव आरोपी संजय रॉयचा जवळचा सहकारी यांच्यावर हीच चाचणी घेण्यासाठी कोलकाता ट्रायल कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.

रुग्णालयातील तिच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या, विशेषत: जे घोष यांचे विश्वासू होते, त्यांचे आणि तिचे पटत नव्हते. यामुळेच या हत्येमागे काही दडलेल्या सत्यांबद्दल सीबीआयला संशय येतो.  या हत्येमागे अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.सीबीआय आर.जी. करमधील आर्थिक अनियमिततेचीही समांतर चौकशी सुरू आहे. आता सीबीआयच्या दोन तपास पथके समांतर तपास करत आहेत आणि दोन्ही प्रकरणांमध्ये काही संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग