शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तर सर्व गाळेधारक आज रस्त्यावर उतरतील... पत्रपरिषदेत व्यापार्‍यांचा इशारा: हॉकर्स स्थलांतराला विरोध कायम

By admin | Updated: April 4, 2016 00:39 IST

जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात पार्कीर्ंगच्या जागेवर चारही बाजूने हॉकर्स बसविण्यास गाळेधारकांचा विरोध असून मनपा प्रशासनाने ही बाब लादली तर सोमवारी सर्व गाळेधारक रस्त्यावर उतरतील, असा इशारा न्यू बी.जे. मार्केटमधील व्यापार्‍यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला.

जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात पार्कीर्ंगच्या जागेवर चारही बाजूने हॉकर्स बसविण्यास गाळेधारकांचा विरोध असून मनपा प्रशासनाने ही बाब लादली तर सोमवारी सर्व गाळेधारक रस्त्यावर उतरतील, असा इशारा न्यू बी.जे. मार्केटमधील व्यापार्‍यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला.
माजी नगरसेवक किशोर भोसले, निशिकांत बामणोदकर, अतुल वाणी, संजय नेवाडकर, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी भोसले यांनी सांगितले की, संत अप्पा महाराज समाधी मंदिराच्या बाजूने मार्केटची मोठी जागा असल्याने त्या बाजूला दोन-तीन रांगांमध्ये हॉकर्स बसविण्यास आमची सहमती आहे. मात्र मार्केटच्या चारही बाजूने २५० हॉकर्सला जागा देण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातला आहे.

इन्फो-
तर आम्हाला मार्केट सोडावे लागेल
मार्केटमध्ये ९४० दुकाने व ६४ फ्लॅट आहेत. त्यांच्याकडील वाहने, दुकानात येणार्‍या ग्राहकांची वाहने यांच्या पार्कीर्ंगसाठी जागाच उरणार नाही. तसेच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आमच्यावरच मार्केट सोडून जाण्याची वेळ येईल, असा इशारा भोसले यांनी दिला.

इन्फो-
प्रशासनाकडून दिशाभूल
एकाच बाजूला हॉकर्सला जागा देण्याचे मान्य केलेले असताना प्रशासनाने दिशाभूल करीत चारही बाजूने हॉकर्सला जागा देण्याचा घाट घातला आहे. मार्केट मनपाचे असले तरी आमच्या हक्कावर ते गदा आणू शकत नाहीत. बॅरीकेटस् बसविण्याचे मान्य केले होते.
मात्र त्याची पूर्तता केलेली नाही. प्रशासनाचे नियोजनच नसल्याने घोळ झाला असून त्यामुळेच घोंगडे झटकण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

------ इन्फो-----
रहिवाशांची सुरक्षा धोक्यात
मार्केटमधील व्यापारी व मार्केटमध्येच वर रहिवासाला असलेले निशिकांत बामणोदकर हे रविवारी सकाळी त्यांचे नातलग आल्याने खाली उतरले असता तीन-चार जणांनी येऊन हॉकर्सला विरोध का करतो? असे सांगत साखळीने मारहाण केली. बाकीच्या व्यापार्‍यांनी धाव घेतल्यावर हल्लेखोर पसार झाले. हॉकर्स येण्यापूर्वीच व्यापार्‍यांना मारहाणीचे प्रकार सुरू झाले आहेत. मनपाच्या मार्केटच्या आवारात २५० च्या आसपास हॉकर्स आणून बसविले तर मार्केटमधील रहिवाशांची विशेषत: महिलावर्गाची सुरक्षितता धोक्यात येणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.