शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहाही जणांना संसदेत जायचे होते, परंतु दोघांनाच पास मिळाले; पाचव्या व्यक्तीलाही पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 10:52 IST

सहाव्या आरोपीचा शोध सुरू

नवी दिल्ली :संसदेच्या सभागृहात बुधवारी झालेला प्रकार हा नियोजित कट होता आणि सहा आरोपींनी तो कट केला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. सागर शर्मा आणि मनोरंजन हे लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत होते. तर, अमोल शिंदे आणि नीलम संसदेच्या बाहेर पकडले गेले. हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. ललित आणि विक्रम हे त्यांचे साथीदार असल्याचा संशय आहे. विक्रमला गुरुग्राममधून ताब्यात घेण्यात आले आहे, तर ललितला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.

...तर त्याला फाशी द्या

माझ्या मुलाने चांगले काम केले असेल तर ठीक आहे, पण जर त्याने काही चूक केली असेल तर त्याला फाशी द्या. तो माझा मुलगा नाही, ती संसद आमची आहे. त्यावर जो कोणी हल्ला करतो तो निषेधार्ह आहे. आम्ही हे मान्य करणार नाही. माझा मुलगा चांगला मुलगा आहे. तो प्रामाणिक आणि सत्यवादी आहे. समाजाचे भले करणे आणि समाजासाठी त्याग करणे हीच त्याची इच्छा असते. तो स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचत असे. असे विचारही पुस्तके वाचून त्याच्या मनात निर्माण झाले असे मला वाटते.- देवराज गौडा, मनोरंजन डी. याचे वडील

पास कसा मिळवला?; प्लॅन कसा आखला?

पाससाठी ते तीन महिन्यांपासून प्रयत्नात होते. आरोपींनी काही दिवसांपूर्वी ही योजना आखली होती. बुधवारी संसदेत येण्यापूर्वी त्यांनी एक रेकी केली होती, असे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी पाच जण संसदेत येण्यापूर्वी गुरुग्राममधील विक्रमच्या निवासस्थानी थांबले होते. योजनेनुसार, सहाही जणांना संसदेत जायचे होते; परंतु फक्त दोघांना पास मिळाले. हे सहा आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे अमोल शिंदे याच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यांची विचारसरणी सारखीच होती आणि म्हणूनच त्यांनी सरकारला संदेश देण्याचे ठरवले.

जिंको किंवा हारो, प्रयत्न करणे महत्त्वाचे...

“हारो वा जिंको, पण प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता बघायचे हा प्रवास किती सुंदर होतो. आशा आहे, पुन्हा भेटू.”  असे लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगत संकेतच दिला होता. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याने दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निषेधात भाग घेण्यासाठी लखनौमधील घर सोडले; परंतु, तो असे करेल याची माहिती नव्हती. त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील आहे. तो नुकताच बंगळुरूहून लखनौला परतला होता. रिक्षा चालवत असे.

टॅग्स :Parliamentसंसद