शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सर्वधर्म समभाव! 33 वर्षीय मुस्लिम तरुण बनला लिंगायत मठाचा पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:18 IST

कमी वयामध्ये बसवन्ना यांनी १२ व्या शतकात समाज सुधारणावादी विचार मांडले होते. याच विचारांनी मुस्लिम तरुण दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला हा प्रभावित झाला होता.

ठळक मुद्देशरीफ याचे वय 33 वर्षे असून त्याला मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतिधाम मठाचा पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मठ खजुरी गावातील कोरानेश्वर संस्थान मठाशी संलग्न आहे. हा मुख्य मठ 350 वर्षे जुना आहे.शरीफ याला काल दिक्षा देण्यात आली.

गदग : उत्तर कर्नाटकातील गदग जिल्ह्यामध्ये असलेल्या एका लिंगायत समाजाच्या मठाने जुन्या परंपरांना, धर्माच्या भेदभावाला बाजुला ठेवले आहे. 12 व्या शतकातील थोर समाजसेवक बसवन्ना यांच्या विचाराला अनुसरून येथील मठाचा पुजारी म्हणून एका मुस्लिम तरुणाची निवड केली आहे. मठाधीशांच्या निर्णयाचे समाजातूनही स्वागत होत आहे. 

कमी वयामध्ये बसवन्ना यांनी १२ व्या शतकात समाज सुधारणावादी विचार मांडले होते. याच विचारांनी मुस्लिम तरुण दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला हा प्रभावित झाला होता. महत्वाचे म्हणजे या मठासाठी मुल्लाच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी दोन एकर जागाही दान केली होती. 

शरीफ याचे वय 33 वर्षे असून त्याला मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतिधाम मठाचा पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा मठ खजुरी गावातील कोरानेश्वर संस्थान मठाशी संलग्न आहे. हा मुख्य मठ 350 वर्षे जुना आहे. याबाबत मठाचे स्वामी मुरुगराजेंद्र कोरानेश्वर यांनी सांगितले की, आम्ही अनुयायांसोबत धर्माचा भेदभाव न करता सर्वांना सामावून घेतो. तुम्ही कोणत्या जातीचे आहात याचा काही फरक पडत नाही. जर देवाने तुम्हाला सद्भावना आणि त्यागाच्या मार्गासाठी निवडले असेल तर त्याचा जन्म आणि जातीच्या जोखडांचा विचार केला जाणार नाही. 

तर या निवडीवर प्रतिक्रिया देताना शरीफ म्हणाले की, मला असे करण्यास कोणी सांगितले नाही. पण माझ्या अंतरात्म्याने ठरविले आणि मला मार्गदर्शन केले. 

लहानपणापासूनच बसवान्नांच्या विचारांचे आकर्षणशरीफ याला काल दिक्षा देण्यात आली. बसवान्नांच्या विचाराची मला लहानपणापासूनच आवड होती. यामुळे मी जवळच्याच गावामध्ये पीठाची चक्की चालवत होतो. तसेच उरलेल्या वेळामध्ये मी बसवन्ना आणि अन्य साधुंचे विचार आत्मसात करत होतो. तसेच त्याची प्रवचनेही करत होतो. स्वामीजींनी माझ्या या छोट्याशा सेवेला मान दिला आणि सोबत घेतले. मी माझे गुरु आणि बसवन्ना यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालणार आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकMuslimमुस्लीम