शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले; आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 09:35 IST

देशात कोणीही परदेशी नाही, सगळे जण हिंदूंचेच पूर्वज; मोहन भागवंतांचं प्रतिपादन

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) काल दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांना हिंदू समाजाबद्दल महत्त्वाचं विधान केलं. हिंदुत्व म्हणजे सत्यासाठी सातत्यानं होणारं संशोधन असं महात्मा गांधी म्हणायचे. हे काम करता करता आज हिंदू समाज थकला आहे. तो झोपी गेला आहे. परंतु ज्यावेळी तो जागा होईल, त्यावेळी आधीपेक्षा अधिक ऊर्जेनं कामाला लागेल आणि सगळं जग प्रकाशमान करेल, असं प्रतिपादन भागवत यांनी केलं.मोहन भागवतांसोबतच्या 'त्या' खास भेटीनंतर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, सांगितलं नेमकं कारणयावेळी भागवत यांनी इतिहासात देशावर झालेल्या आक्रमणांचा संदर्भ देत देशाच्या समरसतेवर भाष्य केलं. 'संपत्ती मिळवण्याच्या हेतूनं आक्रमक शक्तींनी भारतावर हल्ले केले. शक हूण कुषाण आले. पण ते आपल्यामध्ये सामावून गेले. त्यानंतर इस्लाम वेगळ्या स्वरुपात आला. जो आमच्यासारखा होईल, तोच राहणार. जो आमच्यासारखा होणार नाही, त्याला राहण्याचा अधिकार नाही, अशी त्यांची भूमिका होती,' असं भागवत म्हणाले.मिथुन चक्रवर्ती भाजपामध्ये प्रवेश करणार?; मोहन भागवतांनी घेतलेल्या "त्या" खास भेटीमुळे चर्चेला उधाण'मुस्लिम आक्रमकांनी आपल्या संस्कृतींच्या प्रतिकांची मोडतोड केली. त्यांच्याविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालली. लढाईमुळेदेखील संबंधांस कारण ठरते. त्यामुळेच आक्रमणकर्त्यांवरदेखील भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रभाव पडू लागला. समरसतेची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये दाराशिकोहसारखे लोक सहभागी झाले. त्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्यांचा अनुवाद केला,' असं भागवत यांनी म्हटलं.'मुस्लिमांसोबत एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न औरंगजेबानं केला. आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत. कोणी आपल्याला बदलेल याचं भीती नाही. पण या गोष्टी आपण विसरून जाऊ याची भीती आहे,' असं सरसंघचालक पुढे म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ