शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘निर्भया’च्या चारही गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फासावर लटकविणार; नवे डेथ वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 04:57 IST

दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आता २२ जानेवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी फासावर लटकविण्यात येणार आहे. तसे डेथ वॉरंट दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, चौघांना १ फेबुवारी रोजी सकाळी ६ वाजता फासावर चढविण्यात येईल.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी हे डेथ वॉरंट जारी केले. या प्रकरणातील एक दोषी मुकेश सिंह याने फाशीची २२ जानेवारी ही तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी मुकेशसिंहचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, असे न्यायालयास सांगितले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे २२ जानेवारीला चौघांना फाशी देणे शक्य नसल्याने, न्या. अरोरा यांनी नव्या तारखेचे डेथ वॉरंट जारी केले. त्या आधी मुकेशसिंह याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. या निर्णयामुळे अन्य तिघांची फाशीही राष्ट्रपती रद्द करणार नाहीत, असे स्पष्ट झाले आहे. मुकेशसिंह याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींना पाठवितानाच तो फेटाळावा, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना गुरुवारी केली होती. शुक्रवारी रात्री पवन गुप्ता या दोषीनेही दयेचा अर्ज केला.

मुकेशसिंहनंतर अन्य तिघे दोषीही दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे करण्याची शक्यता आहे. मात्र मुकेशसिंहच्या बाबतीत जो निर्णय राष्ट्रपतींनी दिला, तसेच अन्य तिघांच्या बाबतीत घडेल. मुकेशसिंह याने दोन दिवसांपूर्वी दयेचा अर्ज केला होता. निर्भया बलात्कार व हत्याप्रकरणी मुकेशसिंह, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता, रामसिंह व एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. खटल्याचे कामकाज सुरू असताना रामसिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले. त्याची २०१५मध्ये मुक्तता झाली. मात्र जीवाला धोका असल्यामुळे त्याला अज्ञात ठिकाणी पाठविण्यात आले आहे. अन्य चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.वडिलांकडून स्वागतमुकेशसिंह याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्याच्या निर्णयाचे निर्भयाच्या वडिलांनी स्वागतकेले आहे. ते म्हणाले की, दयेचा अर्ज फेटाळला गेल्याने चौघांना लवकर फाशी दिली जाण्याची शक्यता वाढली आहे. दयेचा अर्ज फेटाळला जाणार याची आम्हाला खात्री होती.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयPresidentराष्ट्राध्यक्ष