शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्वच खर्च सरकारतर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:19 IST

शहीद जवानांच्या मुलांच्या सर्वच शिक्षणाच्या खर्चाचा भार आता केंद्र सरकार उचलणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार दरमहा दहा हजार रुपयेच खर्च करीत असे. या मर्यादेला शैक्षणिक सवलत, असे म्हटले जायचे आता ही मर्यादाच काढून टाकण्यात आली आहे.

नवी दिल्ली : शहीद जवानांच्या मुलांच्या सर्वच शिक्षणाच्या खर्चाचा भार आता केंद्र सरकार उचलणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार दरमहा दहा हजार रुपयेच खर्च करीत असे. या मर्यादेला शैक्षणिक सवलत, असे म्हटले जायचे आता ही मर्यादाच काढून टाकण्यात आली आहे.ही सवलत आता सशस्त्र दलांतील अधिकाऱ्यांची मुले, कारवाई दरम्यान बेपत्ता असलेल्या आॅफिसर रँकच्या खालच्या व्यक्ती आणि जे कारवाईत ठार झाले किंवा अपंग झाले त्यांच्या मुलांना लागू होईल. सध्याच्या योजनेचा लाभ सुमारे ३,४०० मुलांना होतोय आणि त्याचा वार्षिक खर्च सुमारे पाच कोटी रूपये आहे.ही शैक्षणिक सवलत सरकारी, सरकारकडून अनुदान मिळणाºया शाळा/शैक्षणिक संस्था, मिलिटरी/सैनिकी शाळांमध्ये तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, पूर्णपणे केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळणाºया स्वायत्त संस्थांमध्ये शिक्षण घेणाºयांनाच लागू आहे, असे संरक्षण मंत्रालयाने टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. म्हणजेच खासगी वा विना अनुदान शिक्षण संस्थांत शिकणाºयांना हा लाभ मिळणार नाही.शहीद आणि अपंग सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणावरील खर्चाला मर्यादा घालण्याच्या आपल्या निर्णयावर संरक्षण मंत्रालय फेरविचार करीत असल्याचे वृत्त डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झाले होते. शिक्षणावरील खर्चाला मर्यादा घालण्याच्या निर्णयाला शहिदांच्या व अपंग सैनिकांच्या कुटुंबियांनी एकत्रितपणे विरोध केल्यानंतर सरकार निर्णयाचा फेरविचार करायला तयार झाले.त्यागाची जाणीव ठेवा- लष्कर, भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या चीफस आॅफ स्टाफ कमिटीने शिक्षणावरील १० हजार रूपये खर्चाची मर्यादा काढून टाकली जावी, असे संरक्षण मंत्रालयाला लिहिले होते.- सरकारच्या या छोट्याशा कृतीने आमच्या शूरवीर महिला आणि पुरुषांच्या कुटुंबीयांना देश त्यांची व त्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवतो एवढा दिलासा त्यांना मिळेल, असे या समितीचे अध्यक्ष व नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा यांनी पत्रात म्हटले.

टॅग्स :educationशैक्षणिक