शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लेकासाठी कुटुंबीयांची धडपड; उपचारासाठी २६ कोटी खर्च, सरकारकडे मदतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:55 IST

एक कुटुंब आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून घरोघरी भटकत आहे.

अलीगडमधील एक कुटुंब आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून घरोघरी भटकत आहे. हे कुटुंब गेल्या २२ महिन्यांपासून त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी घरोघरी भटकत आहे, परंतु अद्याप कोणीही कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे आलेलं नाही. कुटुंबाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मुलाच्या उपचारात मदत करण्याची विनंती केली आहे. परंतु अद्याप सरकारकडून देखील कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मुलाच्या आजाराच्या उपचारासाठी कुटुंबाला तब्बल २६ कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागेल.

स्वप्नील खुराणा हा मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे आणि सध्या एका खासगी आंतरराष्ट्रीय बँकेत काम करतो. २०२१ मध्ये त्यांचं लग्न अलीगडच्या हरमीत कौरशी झाले, लग्नानंतर त्याला अंगद नावाचा मुलगा झाला. जेव्हा मुलाला दीड वर्ष  झालं तरी चालता येत नव्हतं, तेव्हा त्यांनी मुलाला बंगळुरू, जबलपूर आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं. उपचारादरम्यान असं आढळून आलं की, मुलाला 'ड्यूचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी' नावाच्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे. मुलांचे स्नायू हळूहळू कमकुवत होत आहेत.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवनरक्षक जीन थेरपी इंजेक्शन देणं अत्यंत आवश्यक आहे ज्याची किंमत २६ कोटी रुपये असते. कुटुंबाने अलीगड आणि इतर ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांच्या मुलांना वाचवण्याचं आवाहन अधिकाऱ्यांना केलं आहे. आजपर्यंत त्यांना कुठूनही आशेचा किरण दिसलेला नाही.

कुटुंबाने सांगितलं की, त्यांनी अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्रंही लिहिली, परंतु आजपर्यंत त्यांना त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी कुठूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच्या कुटुंबाला अजूनही सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. सध्या हे कुटुंब आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी सतत प्रार्थना करताना दिसत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश