शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 17:19 IST

Ayodhya Case : पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष

ठळक मुद्देमहाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबई/नवी दिल्ली  - अयोध्येतील जमीन मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही येण्याची शक्यता असून, त्यानंतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

अतिगर्दीची ठिकाणे तसेच सर्व धार्मिक स्थळे येथेही बंदोबस्त लावण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी जमू नये, याची काळजी घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. हा निकाल कधी येणार, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने त्याआधी हा निकाल लागेल, हे स्पष्ट आहे.रेल्वे प्रवाशांचे सामान तपासण्यात हयगय करू नका, असे बजावण्यात आले आहे. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. विमानतळांवरील प्रवासी व त्यांचे सामान यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. हॉटेल व रेस्टॉरंट यांनाही सीसीटीव्ही सुरू ठेवा आणि प्रसंगी येणाऱ्यांचे सामान तपासा, अशा सूचना दिल्या आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्सनाही संशयास्पद प्रवासी वा सामान दिसल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना आहेत.

पोलीस महासंचालकांनी घेतली राज्यपालांची भेट

या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना सुरक्षेच्या उपाययोजनाची माहिती दिली. राज्यात सध्या राजकीय अस्थैर्य असल्याने अधिक काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिरRanjan Gogoiरंजन गोगोई