शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाला 'झिंगाट' झालेला पाहून नवरीने दोन तासातच दिला तलाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 14:44 IST

निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला.

ठळक मुद्देनिकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला.सर्व मंडळींसमोर उठा-बशा काढण्याची शिक्षा ही दिली. 

रांची - विवाहसोहळा म्हटलं की त्यामध्ये सेलिब्रेशन, पार्टी या गोष्टी ही येत असतात. मात्र नशा करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला. इतकेच नाही तर जमलेल्या सर्व मंडळींसमोर उठा-बशा काढण्याची शिक्षा ही दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, रांची येथील मौलाना आझाद कॉलनीमध्ये बुधवारी एका निकाहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सिमडेगा येथील वासीम अक्रमची वरात आली होती. कांटाटोली येथील एका बँक्वेट हॉलमध्ये निकाह होत होता. निकाहानंतर एक विधीसाठी नवरीचा भाऊ हा नवरदेवाला बोलवण्यासाठी गेला. तेव्हा नवरदेव त्याचा काही मित्रांसह गांजा पिताना दिसला. यावरून नवरीच्या भावाने वासीमला जाब विचारला. तर त्याने उलट उत्तर देण्यास सुरुवात केली. निकाहसाठी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाची माहिती मिळाली. यानंतर नाराज झालेल्या वधू पक्षाने मुलीला तलाक देण्यास सांगितले. 

तलाक दिल्यानंतर वर आणि वधू या दोन्ही पक्षात वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर थोड्याच वेळात हाणामारीत झाले. त्यावेळी वधू पक्षाने नशेत तर्र झालेल्या नवरदेवाची चांगलीच धुलाई करण्यात आली. तसेच वधू पक्षाने नवरदेवाला आपल्या घरी आणले. गुरुवारी आजुबाजूच्या लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून हुंडा म्हणून घेतलेले पैसै परत देण्यास सांगितले. घेतलेले सर्व पैसे परत दिले तरच घरी सोडलं जाईल ही अट नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांसमोर ठेवली. याशिवाय सर्व गावकऱ्यासमोर नवरदेवाला कान पकडून उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली. हुंडा म्हणून घेतलेले सर्व पैसे परत देण्याची मुलीच्या कुटुंबियांनी मागणी केली होती. त्यानुसार नवरदेवाने 1.5 लाख लगेचच परत केले. मात्र शिल्लक राहिलेले 1 लाख तो परत करू शकला नाही. त्यावेळी वधू पक्षाने त्याची कार आपल्याकडे जप्त करून ठेवली आणि सर्व पैसे परत केल्यानंतरच ही कार त्यांना दिली जाईल असे सांगितले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्न