शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बदलीचे आदेश अन् थेट राजीनामा, बंगालमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिदींचा मोदींना पुन्हा धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:43 IST

परत बाेलावण्याचे हाेते केंद्राचे आदेश

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला केंद्र सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी हा संघर्ष सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्याचे मुख्य सचिव आलापन बंदोपाध्याय यांना केंद्राने तडकाफडकी परत बाेलाविले. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामाेडीनंतर अखेर बंदोपाध्याय यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि लगेच ममता बॅनर्जी यांनी त्यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ममतांनी बंदोपाध्याय यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला हाेता. बंदोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करून केंद्राला धक्का दिला आहे. बंदोपाध्याय हे साेमवारी ३१ मे राेजी सेवानिवृत्त हाेणार हाेते. ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ पानी पत्र लिहून मुख्य सचिवांना परत बोलाविण्याचा आदेश बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले हाेते. तसेच बंदोपाध्याय यांना कार्यमुक्त करण्यास ममतांनी स्पष्टपणे नकार दिला हाेता. पंतप्रधानांना लिह‍िलेल्या पत्रात ममतांनी म्हटले हाेते, की राज्य सरकार सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. अशा वेळी त्यांना कार्यमुक्त करणे शक्य नाही आणि करणारही नाही.ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना सांगितले, की मुख्य सचिवांची बदली आणि कलईकुंडा येथे आपल्यासोबत झालेल्या बैठकीचा काही संबंध नाही, अशी मला आशा आहे. या बैठकीत मला आपल्यासोबत चर्चा करायची होती. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारची बैठक होत असते. ममतांचे टीकास्त्रकेंद्र सरकारने राज्यासोबत चर्चा करून बंदोपाध्याय कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढविला होता. ममतांनी पत्रकार परिषदेतही या आदेशावरून केंद्र सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय केंद्राला काेणत्याही अधिकाऱ्याला परत बाेलाविण्याचा अधिकार नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. बंदोपाध्याय यांना आम्ही कार्यमुक्त करत नसून ते आज सेवानिवृत्त झाले आहेत. पुढील तीन वर्षे ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहतील, असे ममतांनी सांगितले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल