शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:12 IST

ओसामा बिन लादेनची दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा खतरनाक दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली आहे.

नवी दिल्लीः ओसामा बिन लादेनचीदहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा खतरनाक दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली आहे. जवाहिरीनं काश्मीरमध्ये भडकावण्यात येत असलेल्या दहशतवादावरून इशारा दिला आहे. डोन्ट फॉरगेट कश्मीर, असा संदेशही दिला असून, त्यावर मुसाचाही फोटो लावण्यात आला आहे. काश्मीरमध्ये लढत असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवायचं आहे.या दहशतवाद्यांनी एक रणनीती तयार केली पाहिजे. जवाहिरीनं काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा जवानांच्याविरोधात आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. 14 मिनिटांच्या मेसेजमध्ये जवाहिरी म्हणतो, माझ्या विचारानं काश्मीरमध्ये मुजाहिद्दीननं एकचित्त होऊन भारतीय लष्कर आणि सरकारवर निशाणा साधला पाहिजे. त्यांना आत्मघातली हल्ल्यांसारखे घातपात घडवून आणावे लागतील. अशानं भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, तसेच भारतीय लष्कराला याचा मोठा भुर्दंड पडेल. 

अतिरेकी संघटना अल कायदा भारतीय उपखंडात अधिक सक्रिय होत असून, या संघटनेने आतापर्यंत शेकडो सदस्य बनविले आहेत. या संघटनेचे बहुतांश ठिकाणी अफगाणिस्तानात आहेत आणि संघटनेचे प्रमुख बांगलादेशात आहेत. दहशतवादविरोधी तज्ज्ञांनी अमेरिकी संसद सदस्यांना ही माहिती दिली होती. लष्करी डावपेचातील तज्ज्ञ सेथ जी जोन्स यांनी म्हटले होते की, अल कायदाने भारतीय उपखंडात शेकडो सदस्य बनविले आहेत. त्यांची ठिकाणे अफगाणिस्तानातील हेलमंद, कंधार, जाबुल, पख्तिया, गजनी आणि नूरिस्तान प्रांतात आहेत. अफगाणिस्तानातील अल कायदाचे अस्तित्व गत पाच ते दहा वर्षांच्या तुलनेत सध्या अधिक आणि विस्तारित आहे. जोन्स यांनी ही माहिती सभागृहाच्या अंतर्गत सुरक्षा उपसमितीसमोर सांगितली होती. 

टॅग्स :Osama Bin Ladenओसामा बिन लादेनterroristदहशतवादी