शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारनं 'ते' ट्विट गुपचूप डिलीट केलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 09:29 IST

अक्षय कुमारनं पेट्रोल दरवाढीसंदर्भात केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटवरून अक्षय कुमारला आता नेटिझन्सनी ट्रोल केलंय.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमती सातत्यानं वाढतच चालल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता अक्षय कुमारनं पेट्रोल दरवाढीसंदर्भात केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटवरून अक्षय कुमारला आता नेटिझन्सनी ट्रोल केलंय. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर ट्विटरवरून लोकांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्याच वेळी नेटिझन्सना अक्षय कुमारचंही 6 वर्षं जुनं ट्विट सापडलं. त्या ट्विटमुळे अक्षय कुमार ट्रोल झाला आणि त्यानं लागलीच ते ट्विट डिलीट करून टाकलं आहे.अक्षय कुमारनं जे ट्विट डिलीट केलं ते जवळपास 6 वर्षं जुनं म्हणजे 27 फेब्रुवारी 2012मधलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून अक्षय कुमारनं तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणा साधला होता. त्या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं होतं की, पेट्रोलची किंमत ज्या प्रकारे वाढतेय, त्यावरून मला वाटतंय की आता आपल्याला धूळखात पडलेली सायकल साफ करून रस्त्यावर उतरवावी लागणार आहे. अक्षय कुमारच्या या टि्वटमुळे युझर्सही त्याच्यावर तुटून पडले. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल प्रतिलिटर 75 ते 76 रुपयांच्या घरात होते. लोकांनी अक्षयचं हे जुनं ट्विट पाहिल्या पाहिल्याच त्याच्या त्या ट्विटवर प्रश्न उपस्थित केला.सध्या पेट्रोलच्या किमती 80 रुपयांच्या पार गेल्या आहेत. परंतु अक्षय कुमार त्यावर काहीच बोलत नसल्यानं नेटिझन्सनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्यानंतर अक्षय कुमारनं लागलीच 6 वर्षं जुनं ट्विट डिलीट केलं. त्यामुळे साहजिकच लोकांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. अक्षय कुमारनं कोणाला घाबरून ट्विट डिलीट केलं, असा प्रश्नही नेटिझन्सनी आता उपस्थित केला आहे.तसेच यूपीए सरकारवर टीका करणारी अनेक ट्विटरही याआधी अक्षय कुमारनं केली होती. खरं तर दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडत असताना अक्षय कुमारकडून कोणतंही ट्विट अद्याप आलेलं नाही. 2011-12मध्ये पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी विरोध प्रदर्शन केलं होतं. परंतु सध्या तरी पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर कोणत्याही अभिनेत्यानं ट्विट केलेलं नाही. 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारPetrolपेट्रोल