शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Akhilesh Yadav: "कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 10:45 IST

Akhilesh Yadav : "तेव्हा रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या", बाबरी मशिदीबाबत अखिलेश यांचे मोठे विधान

अयोध्या: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हिंदूंच्या श्रद्धेबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. बुधवारी रामनगरी अयोध्येत पत्रकारांनी संवाद साधताना त्यांना वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, "हिंदू धर्मात कुठेही दगड ठेवा, त्याला लाल रंग लावा आणि एखादा भगवा झेंडा ठेवा. तिथे लगेच मंदिर बांधले जाते," असे वक्तव्य अखिलेश यांनी केले आहे.

बाबरी मशिदीबाबत मोठं वक्तव्यअखिलेश यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी यावेळी हातवाऱ्यांमध्ये बाबरी मशिदीबाबतही मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "एक काळ असा होता की, रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या." अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने याला समाजवादी पक्षाचे तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे.

'वाराणसी प्रकरणामागे मोठे षडयंत्र'बुधवारी अयोध्येतील पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष वाराणसीचा मुद्दा जाणूनबुजून उपस्थित करत आहे. वाराणसीच्या प्रश्नामागे मोठमोठे कारखाने विकले जात आहेत. ज्या वेळी तुम्ही-मी ज्ञानवापी मशिदीवर चर्चा करत होतो, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने एक योजना राबवली. आधी त्यांनी वन नेशन वन रेशन योजना राबवली, आता ते वन नेशन वन इंडस्ट्रियालिस्ट ही योजना चालवत आहे."

'उद्योगपतींना मोठ्या वस्तू विकल्या गेल्या'अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "देशातील उद्योगपतींना मोठ्या गोष्टी विकल्या जात आहेत. कंपन्या विकल्या जात आहेत. एलआयसी विकत आहेत, विमानतळ विक्रीवर काढले आहेत, ट्रेन विक्रीवर काढल्या आहेत. उद्योगपती हवे ते विकत घेतील, इंग्रजांनी ज्या प्रकारे डिवाइड अँड रुल केले, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष डिवाइड अँड रुल करत आहे. हे तत्व हजारो वर्षे जुने आहे जे एकेकाळी इंग्रजांनी वापरले होते. भारतीय जनता पक्ष त्याच तत्वावर चालत आहे,"अशी टीका अखिलेश यांनी केली.

भाजपकडून टीकास्त्रभाजपचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "या विधानावरून त्यांनी निवडणूक निकालातून कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसते. अखिलेश यांचे हे विधान हिंदूंचा अपमान करणारे आहे. समाजवादी पक्षाने तुष्टीकरणाची उंची गाठली, याच समाजवादी पक्षाने कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम केले होते. लाल टोपीवाल्यांची तीच टोळी चालवणारे समाजवादी पक्षाचे लोक हिंदूंना अपमानित करण्याचे काम करत आहेत. अखिलेश यादव यांनी हिंदूंची माफी मागावी लागेल." 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवAyodhyaअयोध्याbabri masjidबाबरी मस्जिदMosqueमशिदTempleमंदिर