शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

...तर अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, भाजपा नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:52 IST

केंद्र सरकारने देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने देशात एनपीआर अद्ययावत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. भाजपाचे नेते स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, मग कळेल तिथे काय होतं ते' 

लखनऊ - केंद्र सरकारने देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले असून या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजपाचे नेते स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, मग कळेल तिथे काय होतं ते' असं म्हणत स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानमध्ये जायला हवं. तिथे एक महिना मंदिरात जाऊन पूजा करायला हवी. तेव्हा त्यांना तिथे नेमकं काय होतं हे समजेल. काय हवंय हे त्यांनाच माहीत नाही' असं स्वतंत्र देव सिंह यांनी गुरुवारी (2 जानेवारी) म्हटलं आहे. 

अखिलेश यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यांचा अभ्यास करायला हवा असं देखील भाजपा नेत्याने म्हटलं आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी प्रियंका गांधींवरही आरोप केला आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत काँग्रेसच्या प्रियंका गांधी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. 

एनपीआरचा फॉर्म भरणार नाही. आपण भारतीय नागरिक आहोत की नाही, हे भाजपा ठरवू शकत नाही. आम्हाला रोजगार पाहिजे, एनपीआर नको. देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, असे सांगत अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर हल्लाबोल केला होता. याशिवाय, आम्ही एनआरसी आणि एनपीआर फॉर्म भरणार नाही, तर महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या आंदोलनात कागदपत्रे जाळली होती. आपणही तसेच करायचे, असे आवाहन अखिलेश यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले होते. याचबरोबर, भाजपा सरकार जनतेला घाबरत आहे. त्यामुळे भाजपा सत्य काय आहे, ते जनतेपर्यंत पोहचू देत नाही. देशात अन्याय खूप वाढला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दिला जात नाही. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान अनेक निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना समाजवादी पार्टीकडून मदत करण्यात येईल, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाPakistanपाकिस्तान