शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाला हरवण्यासाठी काय पण'; अखिलेश यादवांनी घेतला मोठा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:32 IST

लोकसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असे मायावतींनी म्हटले होते.

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी वेळ पडल्यास कोणतीही तडजोड करण्याची तयारी प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दाखविली आहे. ते सोमवारी लखनऊ येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अखिलेश यांनी म्हटले की, 2019 च्या निवडणुकीतही आमची बसपाशी असलेली युती कायम राहील. आम्हाला त्यांच्यासाठी जास्त जागा सोडाव्या लागल्या तरी चालेल. मात्र, भाजपाचा पराभव होईल, याची आम्ही काळजी घेऊ, असे अखिलेश यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वीच मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी लोकसभा निवडणुकीत कमीपणा घेण्याची तयारी दर्शविली आहे.  नुकत्याच झालेल्या कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपाला धूळ चारली. कैराना आणि नुरपूरमध्ये विरोधकांनी भाजपाचा पराभव केल्यावर समाजवादी पक्षाने मोठा जल्लोष केला. मात्र, या विजयानंतर मायावतींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मायावतींच्या या मौनाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात होते. मायवतींच्या भूमिकेमुळे या एकजुटीला सुरुंग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे अखिलेश यांनी पुढाकार घेत ही एकजूट अबाधित ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर लढण्याची तयारी दाखवल्याचे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप आघाडीला ७३ जागांवर विजय मिळाला होता. त्यात सपाला ५ आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवरच विजय मिळविता आला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत बसपला खातेही खोलता आले नव्हते, मात्र बसपाच्या मतांची टक्केवारी वाढली होती. शिवाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने जास्त जागा पटकावल्या होत्या. 

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाLoksabhaलोकसभा