शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:21 IST

भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

लखनौ:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमचे फोन टॅप करत आहेत, असा आरोप सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. केंद्रीय संस्थांच्या बळावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला. 

सपच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख अनुपयोगी मुख्यमंत्री असा केला. भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याचे सांगत ते म्हणाले की, आमचे फोन टॅप केले जात आहेत आणि मुख्यमंत्री स्वत: सायंकाळी काही लोकांच्या रेकॉर्डिंग ऐकतात. पत्रकारांना ते म्हणाले की, आपणही सावध रहा.  सपचे राष्ट्रीय सचिव राजीव राय यांच्या ठिकाणांवर आणि अन्य सप नेत्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपला जसजशी हरण्याची भीती त्रस्त करत राहील, तसे उत्तर प्रदेशात त्यांचे नेते, मुख्यमंत्री आणि दिल्लीहून येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत जाईल.

...तर राजकारण बदलू शकते : प्रियांका गांधी

रायबरेली : देशातील जातीयवादी राजकारणावर टीका करताना काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिलांच्या एकजुटीतून देशाचे राजकारण बदलू शकते. काँग्रेसच्या महिला सशक्तीकरण महाअभियानांतर्गत रायबरेलीत शक्ती संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला शक्ती द्या, आम्ही तुम्हाला शक्ती देऊ. आम्ही एकत्रितपणे उभे राहू, तेव्हा कोणीही आम्हाला रोखू शकत नाही. जातियवादाचे राजकारण बंद करून आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. लडकी हूं, लड सकती हूं, ही घोषणा देत प्रियांका गांधी यांनी महिलांना राजकारणात येऊन स्वत:ची लढाई स्वत: लढण्याचे आवाहन केले. उन्नाव आणि हाथरसचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात महिलांचा छळ झाला. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ