शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चाळिशीनंतर आवडते ‘अकेले हम अकेले तुम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 12:01 IST

महत्त्वाकांक्षी लोकांना पाहिजे ‘आजादी’

वॉशिंगटन : मोबाइल क्रांतीने विश्व जवळ आणले असताना जवळचे लोक मात्र दूर नेले असा आरोप करण्यात येतो. एकटेपणाची शिकार झालेले अनेक जण ‘मोबाइल ऑडिक्ट’ श्रेणीतील निघतात. असे असले तरी आता चाळिशीनंतरचे पुरुष-महिला ‘अकेले हम अकेले तुम’ असे दु:खाने नाही तर आनंदाने म्हणत आहेत. अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील एकूण प्रौढांपैकी ४० टक्के एकटे राहत आहेत. त्यापैकी निम्म्या प्रौढांना तर डेटिंग ॲप किंवा तात्पुरते रिलेशनही नकोसे झाले आहे. 

यापुढे लग्न आवश्यक नाही...एकटे राहण्याची इच्छा का वाढत आहे याचा शोध घेण्यासाठी एकटे राहणाऱ्यांच्या कथा संग्रहित करत आहोत. अनेक दशकांपासून विवाहांचे प्रमाण कमी होत आहे. कुटुंब निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक स्थैर्यासाठी लग्न यापुढे आवश्यक नाही. प्रेमसंबंधांमध्ये राहणारे लोक एकटे राहणाऱ्यांपेक्षा चांगले जीवन जगतात. ते त्यांच्या जीवनात अधिक आनंदी आणि समाधानी आहेत.  वैवाहिक जीवन चांगले नसलेल्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य खराब असते.

जितके महत्त्वाकांक्षी तितकेच एकटे राहायची इच्छा १९९० मध्ये अमेरिकेमध्ये एकटे राहणाऱ्या प्रौढांची संख्या २९% होती. घटस्फोटामुळे एकटे राहणाऱ्या ३९% प्रौढांचा या अभ्यासात समावेश नव्हता. टोरँटो विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक ज्योफ मॅकडोनाल्ड त्यांच्या संशोधनात स्पष्ट करतात की, वयाच्या चाळिशीनंतर पुरुषांमध्ये एकटे राहण्याची इच्छा वाढते. त्यात ते अधिक आनंदी राहतात. सेंट बार्बरा येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय सामाजिक मानसशास्त्रज्ञ बेला डीपॉलो म्हणतात की जितके जास्त महत्त्वाकांक्षी लोक तितकेच एकटे राहण्याची इच्छा असते. विशेषतः महिलांना.

कारण काय?जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक एलियाकीम किस्लेव्ह म्हणतात २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार एकटे राहण्याचे मोठे कारण म्हणजे स्वातंत्र्य आहे. एकटे राहिल्यास स्वतःला जास्त वेळ देऊ शकतील. ध्येय पूर्ण करण्यास सक्षम होतील.

टॅग्स :WomenमहिलाAmericaअमेरिका