शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा बरळले, 15 मिनिटांच्या 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार करत आव्हान दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 2:42 PM

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

हैदराबाद - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'मी केलेले '15 मिनिटांचे'  वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागले होते. ज्याचे घाव अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो,' असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये '' आम्ही 25 कोटी आहोत आणि तुम्ही हिंदू 100 कोटी आहात. 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल,'' असे वक्तव केले होते. त्यावेळी या वक्तव्यावरून खूप वाद झाला होता. दरम्यान,   आजारपणातून सावरल्यानंतर ओवेसी यांनी करीमनगर येथे एका सभेला संबोधित केले.यावेळी ओवेसी म्हणाले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. हे जग त्याच व्यक्तीला घाबरवते जो घाबरतो. मात्र जग त्या व्यक्तीला घाबरते जो घाबरवणे जाणतो. मी केलेले '15 मिनिटांचे' वक्तव्य अनेकांच्या वर्मी लागले होते. त्याचे भाव अजून भरू शकलेले नाहीत. त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो.'' 

'मुसलमानांनी वाघासारखे शूर व्हावे जेणेकरून कुठलाही चायवाला त्यांच्यासमोर उभा राहू शकणार नाही. मॉब लिंचिंग होत आहे असे लोक म्हणताहेत. मात्र मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की एवढे त्रस्त होऊ नका. तरुणांना सांगेन की आम्ही येथे जे काही करतो त्याच्या बदल्यात आपल्याला जन्नत किंवा जहन्नूम मिळते. मात्र शहीद जन्नतींच्या जन्नतीमध्ये जातात. त्यामुळे तरुणांनो तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली तरी तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या,' असे आवाहन ओवेसी यांनी केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन