आकांक्षा साळुंके भारतीय संघात
By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST
आशियाई ज्युनियर संघात करणार प्रतिनिधित्व
आकांक्षा साळुंके भारतीय संघात
आशियाई ज्युनियर संघात करणार प्रतिनिधित्वपणजी : क्वालालांपूर (मलेशिया) येथे २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणार्या आशियाई ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेसाठी गोव्याची स्टार खेळाडू आकांक्षा साळुंके हिची भारतीय संघात निवड झाली आहे. गेल्या काही स्पर्धांत आकांक्षाने राष्ट्रीय स्तरावर छाप टाकली होती. त्यामुळे तिला भारतीय ज्युनियर संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. १५ वर्षीय आकांक्षा आता मुलींच्या १९ वर्षांखालील संघात प्रतिनिधित्व करेल. गेल्या वर्षभरात तिने १४ मानांकित स्पर्धांत भाग घेतला होता. त्यातील तिने आठ विजेतेपदे व इतर स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. एवढेच नव्हे, तर येत्या २ ते ६ जानेवारी दरम्यान होणार्या ब्रिटीश ओपन स्पर्धेतही ती सहभागी होणार आहे. दरम्यान, आकांक्षाला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याबद्दल तिची आई म्हणजे कविता सांळुके यांनी आंनद व्यक्त केलाय. ज्युनियर संघाकडून तिला स्वत:ला आणखी सिद्ध करता येईल, अशी प्रतिक्रिया साळुंके यांनी व्यक्त केली.