शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:19 IST

विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे. 

त्रियुग नारायण तिवारी

अयोध्या : नव्या वर्षात २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्या आधीच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले जाणार आहे. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत हे विमानतळ तयार होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य सिंदिया आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी शनिवारी भेट देऊन विमानतळाच्या कामाची पाहणी केली व स्थितीचा आढावा घेतला. विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

कसे असेल विमानळ?विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी एकूण ३२० कोटींचा खर्च येणार आहे. ६,६०० चौरस फूट मीटरची इमारत बांधण्यात येणार आहे.विमानतळाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम राजस्थानी बंशी पहाडपूर येथील दगडांमधून केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी २२०० मीटर लांब व ४५ मीटर रुंद धावपट्टी बांधली आहे. एका वेळी ५०० प्रवासी येथे उतरू शकतात, इतकी याची क्षमता आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू केली जातील. देशभरातील सर्व राज्य तसेच मोठ्या शहरांनी विमानतळांशी कनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणेएअर पोर्ट प्राधिकरणाचे प्रकल्प अभियंता राजीव कुलश्रेष्ठ म्हणाले की, दुसऱ्या टप्यात ५० हजार चौरस फुटांची इमारत बांधली जाईल. त्यावेळी आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सोय केली जाईल. यासाठी ३७५० मीटरचा रनवे तयार केला जाणार आहे.

धुक्यातही लँडिंगची सुविधा लोकलायजर, गाइड पथ, मार्कर, डीएमई कॅलिब्रेशन आदी कामे पूर्ण झाली आहेत. रनवे सेफ्टी एरिया मानकानुसार काम धावपट्टीचे काम करण्यात आले आहे. रनवे आणि कॅट लायटिंगमुळे रात्री किंवा धके असतानाही इथे लँडिग करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या