शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Airplane: जायचे होते बिहारला, पोहोचले राजस्थानला, इंडिगो एअरलाइन्सकडून प्रकार; चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 07:01 IST

Airplane:

नवी दिल्ली :  इंडिगो एअरलाइन्सने बिहारला जाणाऱ्या एका प्रवाशाला राजस्थानला पोहोचवले. उदयपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवाशाच्या लक्षात आले की, विमान कंपनीने त्याला चुकीच्या विमानात बसवले आहे. हे प्रकरण ३० डिसेंबरचे आहे, त्यानंतर इंडिगोने ३१ जानेवारीला प्रवाशाला पाटण्याला पाठवले. इंडिगोचे म्हणणे आहे की प्रवासी चुकीच्या विमानात चढला होता. त्यावर डीजीसीएने जर तो चुकीच्या विमानात चढला, तर प्रवाशाचा बोर्डिंग पास नीट का तपासला नाही, असा सवाल केला. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने केरळमधील कालिकतसाठी उड्डाण केले होते. उड्डाणादरम्यान, त्याच्या उड्डाण व्यवस्थापन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाला हा दोष लक्षात आला नाही. मात्र, नंतर आगीची माहिती मिळाल्यानंतर विमान परत अबुधाबीला सुखरूप उतरवण्यात आले.

स्पाइसजेट कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादावादी- दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार वादावादी झाली. पाटणाकडे  जाणाऱ्या विमानाचे प्रवासी दोन तास उशीर झाल्यामुळे नाराज झाले आणि त्यातून कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. - एका प्रवाशाने सांगितले की, शुक्रवारी स्पाइसजेटचे दिल्ली-पाटणा विमान दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वरून सकाळी ७.२० वा. निघणार होते. - परंतु ते सकाळी १०.१० वाजता निघाले. डीजीसीएने पाटणाऐवजी उदयपूरच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांना बसवल्याच्या प्रकरणाची दखल घेतली आहे.

१ हजार फूट उंचीवर विमानाच्या इंजिनला आगकेरळच्या कोझिकोडला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी पहाटे अबुधाबी विमानतळावर उड्डाणाच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने परतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या घटनेची चौकशी करणार आहे.डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उड्डाणाच्या वेळी विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोइंग ७३७-८०० विमानात एकूण १८४ प्रवासी होते आणि ते सर्व सुरक्षित आहेत. विमानाचे एक इंजिन निकामी झाले होते.अबुधाबीहून कोझिकोडला जाणारे सदर विमान सुमारे १००० फूट उंचीवर असताना इंजिन क्रमांक एकला आग लागल्याने परत गेले. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदन जारी केले असून त्यात विमानाच्या एका इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमान अबुधाबी विमानतळावर सुरक्षितपणे परत आले. 

टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान