शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांत करता येईल विमान तिकीट थेट रद्द; प्रवाशांना द्यावे लागणार नाही अतिरिक्त शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 06:14 IST

डीजीसीएने २४ फेब्रुवारी रोजी सुधारित नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) जाहीर केली.

नवी दिल्ली: विमान प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने (डीजीसीए) तिकीट परताव्याच्या नियमांत सुधारणा केली आहे. आता ठराविक अटींनुसार बुकिंग केल्यानंतर ४८ तासांच्या आत तिकीट रद्द किंवा बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

डीजीसीएने २४ फेब्रुवारी रोजी सुधारित नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) जाहीर केली. त्यानुसार, तिकीट बुकिंगनंतर प्रवाशांना ४८ तासांची 'लुक-इन ऑप्शन' सुविधा देणे विमान कंपन्यांसाठी बंधनकारक असेल. तिकीट रद्द किंवा बदल केल्यास बदललेल्या उड्डाणासाठी लागू असलेले नियमित भाडे (फेअर) मात्र भरावे लागेल.

देशांतर्गत उड्डाणाची तारीख बुकिंगनंतर ७ दिवसांच्या आत किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणाची तारीख १५ दिवसांच्या आत असेल, तर ही सुविधा लागू होणार नाही.

नाव दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क नाही

कंपनीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक केल्यास आणि बुकिंगनंतर २४ तासांत प्रवाशाने स्वतःच्या नावातील चूक निदर्शनास आणून दिल्यास, त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही.

वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तिकीट रद्द केल्यास विमान कंपनी परतावा किंवा 'क्रेडिट शेल' देऊ शकते.

तिकीट परतावा वेळेवर न मिळाल्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. डिसेंबर २०२५ मध्ये २९,२१२ तक्रारी आल्या. ७.५ टक्के तक्रारी परताव्याशी संबंधित होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Cancel Flight Tickets Within 48 Hours; No Extra Charges

Web Summary : DGCA allows free cancellation/changes within 48 hours of booking, excluding fare differences. Name correction is also free within 24 hours of booking. Rules apply to bookings made 7 days before domestic flights and 15 days before international flights.
टॅग्स :airplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकार