शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एअरसेलच्या 5000 कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 12:38 IST

आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बाजारावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली: भारतातील सर्वात लहान आकाराची टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या एअरसेलला घरघर लागली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून लवकरच 5000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असे सांगत कंपनीने कर्मचाऱ्यांना या सगळ्याची आधीच कल्पना दिली आहे. गेल्या काही काळापासून टेलिकॉम क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे एअरसेलवर ही वेळ ओढावल्याचे बोलले जाते.याविषयी बोलताना एअरसेलचे सीईओ कैझाद हिरजी यांनी सांगितले की, आमच्याकडे बऱ्याच काळापासून निधीची चणचण आहे. त्यामुळे कंपनीचे व्यवहार चालवण्यासाठी आम्ही दैनंदिन व्यवसायातून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरच अवलंबून आहोत. गेल्या काही काळापासून या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बाजारावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. आम्हालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळातही मोठे बदल झाले आहेत. या नव्या संचालकांकडून कंपनीला वाचवण्यासाठी नवी धोरणे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, एअरसेलने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून एअरसेल इतिहासजमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आर्थिक चणचणीमुळेच आमचे नेटवर्क आणि प्रणाली कालबाह्य ठरू लागल्याचेही कैझाद हिरजी यांनी सांगितले. रिलायन्स जिओने बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी जुलै 2016 या तिमाहीत एअरसेलचा चालू नफा 120 कोटी इतका होता. जुलै 2017 च्या तिमाहीपर्यंत तो 5 कोटींपर्यंत खाली घसरला. त्यानंतरच्या तिमाहीत तर कंपनीला 120 कोटींचा तोटा झाला. या आर्थिक चणचणीमुळे एअरसेलकडून अनेक देणी थकली आहेत. त्यामुळे टॉवर्स व्हेंडर्सनी एअरसेलच्या अनेक सेंटर्सना सेवा पुरवणे बंद केले आहे. याशिवाय, एअरसेलने घेतलेले कर्ज बुडीत खात्यांमध्ये जमा झाल्यामुळे अनेक बँकांकडून कंपनीची खाती गोठवण्यात आली आहेत. या कर्जांचे हप्ते पुन्हा बांधून द्यायलाही बँकानी नकार दिला आहे. परिणामी सध्याच्या घडीला एअरसेलच्या डोक्यावर 15,500 कोटीच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळेच कंपनीकडून ही कर्मचारी कपात होणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल