शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

विमानात वायफायची सुविधा दिल्यास विमान कंपन्या तिकिटाच्या 30 टक्के दर आकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 13:59 IST

सद्यस्थितीत विमान उड्डाण करत असताना मोबाइल फोन वापरण्याची परवानगी नाही. परंतु तुम्ही लवकरच उडत्या विमानात मोबाइल व कॉम्प्युटरसह इंटरनेटचाही लाभ उठवू शकणार आहात. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं सर्व विमान कंपन्यांना भारतीय हवाई भागात इन-फ्लाइट कनेक्टिविटी (आईएफसी) देण्याची मागणी केली आहे.

चेन्नई- सद्यस्थितीत विमान उड्डाण करत असताना मोबाइल फोन वापरण्याची परवानगी नाही. परंतु तुम्ही लवकरच उडत्या विमानात मोबाइल व कॉम्प्युटरसह इंटरनेटचाही लाभ उठवू शकणार आहात. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं सर्व विमान कंपन्यांना भारतीय हवाई भागात इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी (आईएफसी) देण्याची मागणी केली आहे.मात्र या सुविधेसाठी विमान कंपन्या तिकिटापेक्षा 20 ते 30 टक्के जादा दर आकारण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत हवाई उड्डाणादरम्यान मोबाइल फोन आणि इंटरनेट बंद करून प्लाइट मोडवर ठेवावं लागतं. विमानतळावर विमान असेपर्यंतच तुम्हाला मोबाइल फोन आणि इंटरनेटचा वापर करता येतो. परंतु लवकरच तुम्हाला उड्डाण करणा-या विमानातही वायफाय आणि इंटरनेट वापरता येणार आहे. तुर्कस्थान, चीन, आयर्लंड सारख्या देशांत ही सेवा आधीपासूनच उपलब्ध आहे.या सुविधेसाठी विमानाच्या वर एक छोटा अँटिना बसवण्यात येणार आहे. त्या अँटिनाच्या माध्यमातून उंच उडणा-या विमानात तुम्हाला मोबाइल इंटरनेट वापरता येणार आहे. विमान प्रवासातही मोबाईल, टॅब वापरता यावा, यासाठी ट्रायनं केलेल्या शिफारशीवर विमान कंपन्याही सकारात्मक विचार करत आहेत. परंतु त्या सुविधेसाठी ते तिकिटाच्या 20 ते 30 टक्के जादा दर आकारण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील एअरलाइन्समध्ये एअर-फ्लाइट कनेक्टिव्हिटीला परवानगी देण्यासाठी ट्रायने शुक्रवारी शिफारस केली होती. यासंदर्भात एअरलाइन्स कंपन्यांशी चर्चा केल्यानंतरच कुठलाच ठाम निर्णय झालेला नाही.विमानात तीन हजार मीटरपर्यंत मोबाईल इंटरनेट वापराची सेवा मिळत होती. मात्र विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तीन हजार मीटरपर्यंत उंची गाठत असल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. ट्रायने ही सेवा पुरवण्यासाठी फ्लाइट कनेक्टिव्हिटी सेवा स्थापन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर भारतातील इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सेवा पुरवणाऱ्या कंपनीला एक वर्षासाठी एकच परवाना फी आकारण्यात यावी. तसेच गरज भासल्यास त्यात बदल देखील करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ट्रायच्या म्हणण्यानुसार फ्लाइट कनेक्टिव्हिटी देणाऱ्या कंपनीची नोंदणी आवश्यक असण्याचे सांगितले.