मुंबई : जेट एअरवेज बंद पडल्याने वाढलेली मागणी लक्षात घेत, एअर इंडियाने आपल्या सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय एअर इंडिया प्रशासनाने घेतला आहे. मुंबई-दुबई-मुंबई मार्गावर व दिल्ली-दुबई-दिल्ली मार्गावर ‘बोर्इंग ७८७ ड्रीमलाइनर’च्या दोन्ो विमानांद्वारे फेºया वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवर दर आठवड्याला ३,५०० अतिरिक्त आसने उपलब्ध होतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.
मुंबई दुबई मार्गावर १ जूनपासून, तर दिल्ली दुबई मार्गावर २ जूनपासून ही विमाने धावतील. भोपाळ-पुणे मार्गावर ५ जूनपासून नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सध्याच्या १४ फेºयांमध्ये वाढ होऊन दर आठवड्याला २० फेºया होतील. त्याशिवाय वाराणसी ते चेन्नई दरम्यान नवीन सेवा सुरू करण्यात येईल.दिल्ली रायपूर मार्गावरील फेºयांमध्ये वाढ करून सध्याच्या दर आठवड्याच्या ७ फेºया १४ करण्यात येतील. दिल्ली बेंगळुरू मार्गावरील ३४ फेºयांमध्ये ५ ने वाढ करण्यात येणार आहे. दिल्ली अमृतसर मार्गावरील सध्याच्या २० फेºयांमध्ये वाढ करून २७ फेºया चालविण्यात येतील. चेन्नई अहमदाबाद मार्गावरील २ फेºयांमध्ये वाढ करून दर आठवड्याला ८ फेºया चालविण्यात येतील. चेन्नई कोलकाता मार्गावरील ७ फेºयांमध्ये वाढ करून आता दर आठवड्याला ११ फेºया चालविण्यात येतील.
दिल्ली वडोदरा मार्गावर सध्या सुरू असलेल्या ७ फेºयांमध्ये वाढ करून १४ फेºया चालविण्यात येतील. मुंबई वायझॅग मार्गावरील ७ फेºयांमध्ये वाढ करून दर आठवड्यात १२ फेºया चालविण्यात येणार आहेत.
तिकिटाच्या दरात सवलतड्रीमलाइनर विमानांच्या सेवेमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आसने, जास्त लेगरूम, बॅगेज सुविधा मिळतील. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाने दिल्ली व मुंबई येथून दुबई जाण्यासाठी ७,७७७ रुपयांमध्ये विशेष इकॉनॉमी तिकीट उपलब्ध करून दिले असून, ३१ जुलैपर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे.