शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विक्रीसाठी लवकरच निघणार इरादापत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:03 IST

एअर इंडियाची विक्री करण्याचे प्रयत्न भारत सरकारने पुन्हा एकदा सुरू केले आहेत.

नवी दिल्ली : एअर इंडियाची विक्री करण्याचे प्रयत्न भारत सरकारने पुन्हा एकदा सुरू केले आहेत. नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, येत्या काही आठवड्यांत आपले मंत्रालय इच्छुक खरेदीदारांसाठी इरादापत्रे (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) जारी करील.एका पत्रकार परिषदेत पुरी यांनी सांगितले की, विमान वाहतुकीसाठी आपले मंत्रालय केंद्रक संस्था आहे. तथापि, मी निर्गुंतवणुकीचा प्रभारी नाही. एअर इंडिया ही पहिल्या दर्जाची एअरलाईन आहे. तथापि, कंपनीचे खाजगीकरण करणे आवश्यक झाले आहे. कंपनीच्या खाजगीकरणाबद्दल कोणतेही दुमत नाही. एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यास भारतातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगो आणि अबुधाबीची एतिहाद एअरवेज कंपनी इच्छुक असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना भेटले आहेत.पूर्ण हिस्सेदारी विकणारगेल्या वर्षी एअर इंडियाची विक्री करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला होता. कंपनीतील ७६ टक्के हिस्सेदारी विकून २४ टक्के हिस्सेदारी आपल्याकडे कायम ठेवण्याचा तेव्हा सरकारचा मानस होता.तथापि, सरकारचे लोढणे गळ्यात नको म्हणून कोणी खरेदीदारच पुढे आला नव्हता. त्यामुळे आता सरकारने एअर इंडियातील संपूर्ण १०० टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी केली आहे.सिंगापूर आणि लंडन येथे त्यासाठी रोड शो आयोजित करण्यात आले होते. तथापि, त्याला मिळालेला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया