शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:31 IST

वैभव आणि जिनलच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार होता. मात्र त्याआधी ओटीभरणाच्या कार्यक्रमात जिनल आणि वैभव अहमदाबादला आले होते.

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या अनेक कटू आठवणी आयुष्यभर लोकांच्या मनाला वेदना देत राहणार आहेत. या अपघातात कुणी मुलाला गमावले तर कुणी आईला, एकानेही त्याचे अख्खं कुटुंब गमावले. आता या दुर्घटनेतील आणखी एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. या विमानात वैभव पटेल आणि जिनल गोस्वामी हे जोडपे होते, जे जिनलच्या ओटीभरणीच्या कार्यक्रमासाठी अहमदाबादला आले होते. 

२९ वर्षीय वैभव पटेल आणि २७ वर्षीय जिनल गोस्वामी काही दिवसातच आई वडील भूमिकेत येणार होते. जिनल ७ वर्षाची गर्भवती होती. ती काही दिवसांतच तिच्या बाळाला जन्म देणार होती. वैभव आणि जिनल या दोघांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. घरातील नव्या सदस्याच्या स्वागतासाठी कुटुंब आतुरले होते. २ जून रोजी कुटुंबाने पारंपारिक पद्धतीने ओटीभरणीचा कार्यक्रम केला. १२ जूनला अहमदाबाद विमान दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला. त्यातील हे एक जोडपे होते. मूळचे वासना गावातील ते रहिवासी गेल्या काही काळापासून लंडनला राहायला होते. 

वैभव आणि जिनलच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार होता. मात्र त्याआधी ओटीभरणाच्या कार्यक्रमात जिनल आणि वैभव अहमदाबादला आले होते. त्यानंतर १२ जून रोजी ते लंडनसाठी निघाले. परंतु दुर्दैवाने ते ज्या विमानातून प्रवास करत होते ते एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले आणि भीषण अपघात झाला. जिनल आणि वैभव यांच्या मृत्यूने कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. २ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते भारतात आले होते. ७ महिन्याची गर्भवती असणारी जिनल तिच्या बाळाच्या आगमनाने खुश होती. घरातील सर्व तिच्या आनंदात सहभागी झाले होते. मात्र हा आनंद कायमचा हिरावून गेला आहे.

दरम्यान, २ दिवसापूर्वीच जिनलने मला फोन केला होता. ती घरी जाणार सांगत होती. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होतो. एकत्र मजामस्ती करायचो. आम्ही संपूर्ण भारत भ्रमंती केली आहे. बऱ्याचदा गोवा, राजस्थानला गेलो. हा अपघात खूप वेदनादायी आहे. दुर्घटनास्थळी जी कृष्णाची मूर्ती सापडली, ती जिनलची असल्याचा दावा तिच्या कुटुंबासह मित्र मैत्रिणींनी केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातahmedabadअहमदाबाद