शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:15 IST

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत.

Air India Plane Crash: एअर इंडियाच्याविमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. काल अहमदाबादमध्येविमान कोसळून सूमारे 295 लोकांचा मृत्यू झाला, ते विमानदेखील एअर इंडियाचेच होते. त्यामुळे आता एअर इंडियाच्या विमानांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण एअर इंडिया विमानाबाबत आपापला अनुभव शेअर करत आहेत.

सध्या लिंक्डइनवर राजीव बजाज नावाच्या युजरने केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये एअर इंडियाच्या विमान हवेत असताना मोठा बिघाड झाल्याचा दावा केला जातोय. या पोस्टमध्ये म्हटले की, '1 जून 2025 रोजी नवी दिल्लीहून हाँगकाँगला निघालेल्या एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI 314 ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसणाऱ्या विमानाच्या दारावर झूम करुन बारकाईने पाहा.'

'विमानाने उड्डाण घेतल्याच्या सुमारे 1 तासानंतर दरवाजा थरथर कापू तर लागलाच, शिवाय आवाजही येऊ लागला. हवेच्या दाबामुळे दरवाजाचा सील आपोआप तुटला. त्यानंतर एअर होस्टेसने कसेबसे दरवाजा हाताने ओढून त्यात कागदी नॅपकिन्स भरले. सुदैवाने विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरले. मला कंपनीला बदनाम करायचे नाही, पण आपण प्रत्येकाने सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला पाहिजे. मला वाटते की, उड्डाणापूर्वी सुरक्षेची योग्य तपासणी घेणे गरजेचे आहे,' अशी पोस्ट राजीव बजाज यांनी शेअर केली. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानahmedabadअहमदाबाद