शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:31 IST

Air India Plane Crash: अमेरिकन नियामक फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) २०१८ मध्ये ७८७ आणि ७३७ सह बोईंग विमानांच्या काही मॉडेल्समध्ये इंधन नियंत्रित करणाऱ्या ‘स्विच लॉकिंग’ सुविधेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विमान वाहतूक नियामक डीजीसीएने सोमवारी विमान कंपन्यांना त्यांच्या बोईंग ७८७ आणि ७३७ विमानांमधील ‘फ्युएल स्विच लॉकिंग’ प्रणाली तपासण्यास सांगितले आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमेरिकन नियामक फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) २०१८ मध्ये ७८७ आणि ७३७ सह बोईंग विमानांच्या काही मॉडेल्समध्ये इंधन नियंत्रित करणाऱ्या ‘स्विच लॉकिंग’ सुविधेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली होती. तथापि, यात सुरक्षिततेच्या चिंतेचा विषय असल्याचे संकेत नव्हते.

डीजीसीएने म्हटले आहे की, त्यांच्या निदर्शनास आले आहे की अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्यांनी त्यांच्या विमान ताफ्याची तपासणी सुरू केली आहे. सर्व विमान कंपन्यांना २१ जुलै २०२५ पूर्वी तपासणी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल संबंधित प्रादेशिक कार्यालयासह या कार्यालयाला देण्यात यावा. एएआयबीने अहवालात म्हटले आहे की, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा करणारे स्विच टेक ऑफच्या काही सेकंदातच बंद करण्यात आले होते, ज्यामुळे ते लगेचच कोसळले.

यांत्रिक वा देखभाल मुद्द्याचा उल्लेख नाही : एअर इंडिया सीईओ विल्सनकोसळलेल्या विमानाच्या प्राथमिक अहवालाने आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटले आहे. वैमानिक व विमानाच्या फिटनेसचा बचाव करताना ते  म्हणाले, विमानाच्या इंजिनात कोणत्याही प्रकारची यांत्रिक समस्या असल्याचा उल्लेख अहवालात नाही. तसेच देखभाली संदर्भातील मुद्द्याचा उल्लेख केलेला नाही. कारण देखभालीसंदर्भातील सर्व कामे पूर्ण केली होती. दुर्घटनेनंतर काही दिवसांत सतर्कता बाळगली. डीजीसीएच्या निगराणीत ताफ्यातील बोइंग ७८७ विमानांची तपासणी करण्यात आली व ते सेवेसाठी उपयुक्त असल्याचे निष्पन्न झाले, असे ते म्हणाले.

मानवी चुकीमुळे स्वीच बंद झाले : तज्ज्ञविमान उड्डयण क्षेत्रातील तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांच्यानुसार, अहमदाबाद अपघातापूर्वी विमानाच्या इंधनाचे स्वीच मानवी चुकीमुळेच बंद झाले होते. विमान अपघात तपास ब्युरोचा प्राथमिक अहवाल अधिक पारदर्शक असायला हवा होता, असे मतही त्यांनी मांडले. वैमानिकांना प्रशिक्षण देणारे पहिले प्रशिक्षक म्हणून ओळख असलेले रंगनाथन म्हणतात, इंधनाचे हे स्वीच आपोआप बंद किंवा चालू होऊ शकत नाही. त्याला कुणीतरी खाचेतून बाहेर काढूनच हाताने बंद किंवा चालू करावे लागते. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना