शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:59 IST

विजय रुपाणी याच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये होते, जे १२ जून रोजी अहमदाबाद ते लंडनसाठी रवाना झाल्यानंतर काही मिनिटांतच खाली कोसळले.

अहमदाबाद - गुजरातच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातात २६५ लोकांचा जीव गेला आहे. त्यातील एक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते. रूपाणी यांच्या मृत्यूबाबत विविध दु:खद योगायोग समोर आलेत. हा नशिबाचा क्रूर खेळ असावा म्हणून रुपाणी अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. लंडनला जाण्यासाठी रुपाणी यांचे हे तिसरे तिकिट होते. याआधी २ वेळा त्यांनी आपले तिकिट कॅन्सल केले आणि सर्व कामे आटोपून ते १२ जूनच्या एअर इंडियाच्या विमानाने लंडनला चालले होते आणि हेच प्लेन क्रॅश झाले. त्यात एक प्रवासी वगळता सर्वांचा मृत्यू झाला.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अखेरच्या प्रवासाबाबत अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी समोर आल्यात. अहमदाबाद ते लंडन थेट विमान सेवेच्या ज्या फ्लाईटमध्ये त्यांचे निधन झाले ही सेवा त्यांनीच सुरु केली होती. विजय रुपाणी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अहमदाबाद ते लंडन थेट विमान सेवा नव्हती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे विजय रुपाणी यांनी गुजरातच्या अहमदाबाद ते लंडन विमान सेवा सुरू करून लोकांना भेट दिली होती. 

आणखी एक कनेक्शन त्यांच्या १२०६ या नंबरशी जोडले आहे. रुपाणी यांचे निधन १२ जून म्हणजे १२/०६ तारखेला झाले. हा नंबर त्यांच्यासाठी खास होता. त्यांना हा नंबर इतका आवडायचा की त्यांनी त्यांच्या कार, स्कूटरला हाच नंबर घेतला होता. आता नशिबाचा आणखी एक खेळ म्हणजे अहमदाबाद ते लंडन बोइंग ७८७ ड्रिमलायनर AI 171 विमानाचे हे त्यांचे तिसरे तिकिट होते. पहिले तिकिट १९ मे रोजी बुक केले होते. रुपाणी भाजपाचे पंजाबमधील प्रभारी होते. १९ जून रोजी लुधियाना पोटनिवडणुकीमुळे त्यांना हे तिकिट कॅन्सल करावे लागले. रुपाणी यांनी त्यानंतर ५ जून रोजी तिकिट काढले परंतु कौटुंबिक कारणास्तव त्यांना हे तिकीटही रद्द करावे लागले. त्यानंतर १२ जूनला त्यांनी लंडनला जाणारे तिकिट बुक केले आणि हाच त्यांचा अखेरचा प्रवास ठरला.

विजय रुपाणी याच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये होते, जे १२ जून रोजी अहमदाबाद ते लंडनसाठी रवाना झाल्यानंतर काही मिनिटांतच खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवाशी होते. ज्यातील २४१ लोकांचा जीव गेला. या भीषण अपघातात केवळ एकच व्यक्ती जिवंत वाचला. ज्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने देश सुन्न झाला आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातVijay Rupaniविजय रूपाणीahmedabadअहमदाबाद