शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Air India ची 'डोमेस्टीक' उड्डाणे ७ दिवसांसाठी रद्द, इंटरनॅशनल उड्डाणांच्या वेळेतही बदल; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 21:26 IST

एअर इंडियाने काही मार्गांवरील देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली-

एअर इंडियाने काही मार्गांवरील देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. एअरलाइनच्यावतीनं दिलेल्या माहितीनुसार १९ जानेवारी ते २४ जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनी सकाळी १०:३० ते दुपारी १२:४५ पर्यंत दिल्लीला जाणारी आणि दिल्लीहून उड्डाण घेणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पण नियोजित वेळेच्या आधी किंवा नंतर होणारी उड्डाणे नेहमीप्रमाणे सुरू राहतील असंही सांगण्यात आलं आहे. 

एअरलाइनचा निर्णय दिल्ली विमानतळाने जारी केलेल्या नोटिस टू एअरमेन (NOTAM) नुसार आहे. ७४ व्या प्रजासत्ताक दिनापर्यंत एका आठवड्यासाठी दररोज सुमारे तीन तास हवाई क्षेत्र प्रतिबंधित केले जाईल असे एअरलाइनने म्हटले आहे. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या वेळेत बदलआंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियानं एक तासाच्या विलंबाने किंवा पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की एलएचआर (लंडन), आयएडी (डलेस), ईडब्ल्यूआर (नेवार्क), केटीएम (काठमांडू) आणि बीकेके (बँकॉक) या पाच स्थानकांवरून अति-लांब पल्ल्याची, लांब पल्ल्याच्या आणि कमी पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशनला एक तास उशीर होणार आहे.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत कोणतेही आंतरराष्ट्रीय ऑपरेशन रद्द करण्यात आलेले नाही. IGI विमानतळ, नवी दिल्ली येथून येणार्‍या/निर्गमन करणार्‍या देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची विनंती केली जात आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया