शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बर्थ-डे पार्टीनंतर रस्त्यावर मिळाला एअर होस्टेसचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 00:34 IST

कोलकाता विमानतळापासून जवळच असलेल्या केस्टोपूर परिसरात राहणा-या एअर होस्टेस खोंगसित क्लारा बन्शा राय हिचा मृतदेह येथील रस्त्यावर मिळाला.

कोलकाता, दि. 17 - कोलकातामध्ये इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करणा-या एका एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोलकाता विमानतळापासून जवळच असलेल्या केस्टोपूर परिसरात राहणा-या एअर होस्टेस खोंगसित क्लारा बन्शा राय हिचा मृतदेह येथील रस्त्यावर मिळाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून पुढील तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर होस्टेस खोंगसित क्लारा बन्शा राय हिने मंगळवारी रात्री तिचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी तिच्यासोबत दोन मित्र सुद्धा वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होते. त्यानंतर दुस-या दिवशी खोंगसित क्लारा बन्शा राय हिचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटजवळील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर सोसायटीच्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.  अपार्टमेंटमधील लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणा-या खोंगसित क्लारा बन्शा राय हिने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी तिच्यासोबत चार जण फ्लॅटमध्ये आले होते आणि रात्री उशिरापर्यंत आवाज येत होता. दरम्यान, पोलिसांना फ्लॅटमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही दारुच्या नशेत होते. तसेच, फ्लॅटमधून दारुच्या बॉटल सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच खोंगसित क्लारा बन्शा राय या अपार्टमेंटमध्ये राहायला आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोंगसित क्लारा बन्शा राय हिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. तिचा  मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून पुढील तपास सुरु आहे. ती मूळची मेघालयातील असून इंडिगो एअरलाइन्समध्ये कामाला होती. तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला होता.