शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वायुदलाने विदेशातून आणली ३५२ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 01:25 IST

गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.

ठळक मुद्देगृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या महाकाय मालवाहू विमानाने (आयएल-७६) बुधवारी सिंगापूर आणि बँकाॅकहून ३५२ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणि क्रायो कंटेनर आणली आहेत. कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा भासत असून यावर मात करण्यासाठी ही सिलिंडर्स आणि कंटेनर आणण्यात आली आहेत.

गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. बँकाॅकहून आणलेली तीन क्रायो सिलिंडर पश्चिम बंगालमधील पनगढ तळाकडे रवाना करण्यात आली आहेत.  आतापर्यंत महाराष्ट्राला १७४, उत्तर प्रदेशला ६४१, मध्य प्रदेशला १९०, हरियाणाला २२९, तेलंगणाला १२३ आणि दिल्लीला ७०७ टन वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचता करण्यात आला आहे. एका ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनमध्ये १६ टन वैद्यकीय ऑक्सिजन लादलेला असून, या ट्रेन ताशी ६५ किलोमीटर वेगाने धावतात.

ऑक्सिजन एक्स्प्रेसची लक्षणीय कामगिरी भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने गेल्या १६ दिवसांत देशभरात २,०६७ टन वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचता केला. यापैकी दिल्लीला सर्वाधिक ७०७ टन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशला ६४१ टन ऑक्सिजन मिळाला आहे. सध्या ३४४ टन द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजन असलेले टँकर देशाच्या विविध भागातील मार्गावर आहेत. भारतीय रेल्वेने विविध राज्यांत २,०६७ टन द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजनचे १३७ टँकर पोहोचते केले आहेत. आतापर्यंत ३४ ऑक्सिजन एक्स्प्रेसनी हा साठा पोहोचता करण्यात आला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीindian air forceभारतीय हवाई दलOxygen Cylinderऑक्सिजन