शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

काश्मीरवर हवा राजकीय तोडगा

By admin | Updated: August 21, 2016 03:46 IST

गेले ४३ दिवस काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीयदृष्ट्याच तो प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी काश्मीरमधील सर्व संबंधितांशी केंद्र सरकारने ताबडतोब

नवी दिल्ली : गेले ४३ दिवस काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीयदृष्ट्याच तो प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी काश्मीरमधील सर्व संबंधितांशी केंद्र सरकारने ताबडतोब चर्चा सुरू करावी, अशी विनंती काश्मीरमधील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शनिवारी केली. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याची तक्रारही या नेत्यांनी केली. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. ए. मीर, माकपचे आमदार तारिगामी, अपक्ष आमदार हकीम यासीन व काँग्रेसचे अनेक आमदार होते. काश्मीरमधील जनतेशी केंद्र आणि राज्य सरकारचा संवाद पूर्णपणे तुटला असून, तो नव्याने सुरू करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रपतींना सांगितल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांना दिली. काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित गटांशी चर्चा करणे आवश्यक आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांद्वारे बळाचा वापर केला जात असून, त्यामुळे जनतेमध्ये संताप आहे. त्यातच पेट्रोलपासून अनेक जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्यामुळे जनतेचे हाल सुरू आहेत, असे ते म्हणाले (वृत्तसंस्था) अन्य भागांतही पसरतेय आंदोलनआतापर्यंत काश्मीरच्या खोऱ्यातच असलेले आंदोलन आता जम्मू आणि कारगिलच्या पीर पंजाल आणि चेनाबच्या खोऱ्यातही पसरत चालले आहे. या प्रकारे संपूर्ण जम्मू-काश्मिरात आंदोलन पसरले, तर स्थिती भयानकच होईल, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी लवकरात लवकर स्थिती सुधारण्यासाठी केंद्राला पावले उचलायला सांगावे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.काश्मीरमधील सर्व जनता अतिरेक्यांबरोबर आहे, असे समजणेच मुळात चुकीचे आहे, पण सरकारी यंत्रणा जनतेला फुटीरवादी समजून, त्यांच्याशी तसे वागत आहे आणि त्यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे, असा आरोप शिष्टमंडळातील नेत्यांनी केला. काश्मिरात ४३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीतकाश्मीर खोऱ्यातील जनजीवन सलग ४३ व्या दिवशीही सुरळीत होऊ शकले नाही. श्रीनगर जिल्ह्यासह अनंतनाग आणि पम्पोर शहरांतील संचारबंदी शनिवारीही सुरू होती. खोऱ्यात आतापर्यंत ६४ लोकांचा बळी गेला आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कार्यालये आज बंद होती, तर सरकारी कार्यालयांतही फारशी उपस्थिती नव्हती. सहा दिवसांच्या निर्बंधानंतर खोऱ्यात पोस्टपेड मोबाइल सेवा शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. अफवा पसरू नयेत, यासाठी खोऱ्यातील मोबाइल सेवा बंद करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सर्व कंपन्यांची पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्री-पेड मोबाइलची आउटगोइंग सेवा सुरू झालेली नाही. शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा घणाघाती हल्ला गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे केला. हा शेजारी देश खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. तिरंगा रॅलीला संबोधित करताना ते येथे बोलत होते.