शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:50 IST

यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS), वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) यासह अनेक पक्षांचे हजारो लोक आणि सदस्य उपस्थित होते.

संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या वक्फ कायद्याविरोधात काही राज्यांमध्ये निदर्शने होताना दिसत आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. यातच शनिवारी रात्री (१९ एप्रिल २०२५) ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने हैदराबादेत एका सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याला एआयएमआयएमनेही (AIMIM) पाठिंबा दिला.

दरम्यान, ३० एप्रिल २०२५ रोजी ब्लॅकआउट निषेध करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. यात रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येतील. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय दारुस्सलाम येथे आयोजित 'वक्फ वाचवा, संविधान वाचवा' जाहीर सभेत, ही घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS), वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) यासह अनेक पक्षांचे हजारो लोक आणि सदस्य उपस्थित होते.

'आपल्याला संपवू इच्छिणाऱ्या शक्तींविरुद्ध आंदोलन' -एआयएमआयएम प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "हे आंदोलन आपल्याला संपवू इच्छिणाऱ्या शक्तींविरोधात आहे, मात्र आपण पुढेही वाढत राहू. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शक्तींचा पराभव होईल. आम्ही झुकणार नाही. जेव्हा मी संसदेत कायदा फाडला, तेव्हा मी माझ्या इतर धर्मातील सर्व बंधू आणि भगिनींच्या वतीने ते केले. ज्यांना अशा प्रकारच्या क्रूर कायद्यांचा फटका बसेल."

१८ मे रोजी राउंड-टेबल मीटिंग -या सर्वसाधारण सभेत १८ मे रोजी शहर पातळीवर राउंड-टेबल मीटिंग आयोजित करण्याचा आणि नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये अशाच बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मे रोजी हैदराबादमधील ईदगाह बिलाली हॉकी ग्राउंडवर महिलांच्या एक सभेचे आयोजित केली जाईल. यानंतर, २५ मे रोजी हैदराबादमध्ये दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत मानवी साखळी करून निषेध करण्यात येईल आणि १ जून रोजी धरणे दिले जाईल. याशिवाय, "स्थानिक नेतृत्वाशी सल्लामसलत करून आंध्र आणि तेलंगणा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सभा घेतल्या जातील," अशी घोषणाही एआयएमपीएलबी नेतृत्वाने रविवारी केली. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMuslimमुस्लीमTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेस