शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

असदुद्दीन ओवेसींची घोषणा, 'बच्चे दो ही अच्छे' कायद्याचं समर्थन करणार नाही; सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:42 IST

"आपण अशा कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही, ज्यात दोन मुले जन्माला घालण्याची मर्यादा निश्चित केलेली असेल."

देशात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. देशातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी एका वर्गाकडून होत आहे. यातच, आपण अशा कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही, ज्यात दोन मुले जन्माला घालण्याची मर्यादा निश्चित केलेली असेल, असे एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले, 'चीनने केलेली चूक आपण टाळायला हवी. मी अशा कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही, ज्यात दोन अपत्यांसंदर्भात धोरण तयार करण्याचा उल्लेख असेल. यामुळे देशाला कसल्याही स्वरुपाचा फायदा होणार नाही.' यापूर्वी लोकसंख्या वाढीसाठी मुस्लीम समाजाला जबाबदार ठरवले जाऊ नये, असेही ओवेसी यांनी म्हटले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर बोलताना, मुस्लीम लोकसंख्या वाढीसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, उत्तर प्रदेशात, कुठल्याही कायद्याशिवाय, 2026-2030 पर्यंत अपेक्षित प्रजनन दर गाठला जाईल. त्यांच्या स्वतःच्याच आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे, की  लोकसंख्या नियंत्रणासाठी देशात कुठल्याही प्रकारच्या कायद्याची आवश्यकता नाही. अधिकांश गर्भनिरोधकांचा वापर मुस्लीम समाजच करत आहे. 2016 मध्ये एकूण फर्टिलिटी रेट 2.6 एवढा होता. जो आता 2.3 वर आला आहे.

तत्पूर्वी, लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांत धर्मांमधील "लोकसंख्या असमतोल" होणार नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, असे झाल्यास अराजक निर्माण होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. "कुण्या एका वर्गाचा लोकसंख्या वृद्धी दर अधिक, असे होऊ नये. आम्ही 'मूळ निवासीं'च्या जागरूकतेसोबतच लोकसंख्या नियंत्रणावरही करतो. लोकांना अशा प्रयत्नांच्या माध्यमाने लोकसंख्या नियंत्रणासाठी जागरुक करायला हवे,” असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन