शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Triple Talaq: मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्याचा घाट; ओवैसींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:32 IST

'सबरीमालावेळी प्रथा परंपरा आठवल्या, मग आता का आठवत नाहीत', असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला

नवी दिल्ली: तिहेरी तलाक कायदा फक्त आणि फक्त मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख आणि खासदार यांनी केला. आज लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. यानंतर ओवैसींनी सरकारवर घणाघाती टीका केली. मुस्लिम पुरुषांना तुरुंगात टाकण्यासाठी, मुस्लिम महिलांना कमजोर करण्यासाठी तिहेरी तलाक कायदा आणण्याचा घाट सरकारनं घातल्याचा दावादेखील त्यांनी केला. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती ओवैसींनी व्यक्त केली. लोकसभेत आज तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर आज वादळी चर्चा झाली. भाजपा खासदार आणि मंत्र्यांनी या विधेयकाबद्दलची सरकारची बाजू मांडली. तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. या विधेयकावर एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार यांनी आपलं मत स्पष्ट करताना आस्था आणि श्रद्धेचा मुद्दा उपस्थित केला. सबरीमाला प्रकरण चर्चेत होतं. सर्वोच्च न्यायालयानं त्या प्रकरणात निकाल सुनावला. त्यावेळी आस्थेचा, प्रथा-परंपरेचा मुद्दा चर्चेत आला. मग आता तिहेरी तलाक आमच्या आस्थेचा, परंपरेचा विषय नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.एक पुरुष कितीही महिलांशी संबंध ठेवू शकतो. त्यात कोणताही गुन्हा नाही. पण तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मी या विधेयकाला विरोध करतो, असं ओवैसी म्हणाले. सबरीमालामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. त्यावेळी अनेकांनी आस्था, प्रथा, परंपरांचा मुद्दा उपस्थित करत महिलांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. तुमची ती आस्था असते. मग आमची आस्था नसते का? ती का मान्य केली जात नाही?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. व्यभिचाराबद्दलचा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यभिचार गुन्हा नाही. मात्र तिहेरी तलाकला गुन्ह्यांचं स्वरुप देण्याचा प्रयत्न होत आहे. या कायद्याचा प्रचंड प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनlok sabhaलोकसभा