शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

"ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? पुलवामानंतर जसं..."; जम्मूतील ड्रोन हल्ल्यावर ओवेसींची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 18:50 IST

jammu drone attack : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी.

नवी दिल्ली - जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी रविवारी दोन ड्रोनच्या सहाय्याने बॉम्ब हल्ला केला. यात हवाई दलाचे 2 कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी. (AIMIM chief Asaduddin owaisi on jammu drone attack)

एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी सोमवारी म्हणाले, ड्रोनने बरेच अंतर कापले आणि असे वाटते, की हे ड्रोन अमेरिका अथवा चिनी बनावटीचे असावेत. जम्मू एअर बेसवर हा पुलवामा सारखाच हल्ला आहे. आता जबाबदारी सरकारची आहे. ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? मोदी सरकार बदला घेईल का? त्याला पुलवामा हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर देण्यात आले होते, त्याच पद्धतीने पुन्हा उत्तर द्यायला हवे." 

जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी

भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोनने करण्यात आलेले हल्ले आणि पुलवामा जिल्ह्यात एक विशेष पोलीस अधिकारी, त्यांची पत्नी आणि मुलीची दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येविरोधात शिवसेना डोगरा फ्रंट (एसएसडीएफ)च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पाकिस्तानचा झेंडा जाळला. रविवारी जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर दोन ड्रोनने बॉम्ब हल्ला केला होता. यानंतर काही तासानंतर दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका गावात एक एसपीओ, त्यांची पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केली होती.

आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन - जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी लष्करी तळालाही लक्ष्य करण्याचा  प्रयत्न केला. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालूचक लष्करी तळावर दोन ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. लष्कर सज्ज असल्याने ड्रोन दिसताच त्यावर 20 ते 25 राऊंड फायरिंग करण्यात आली. 

Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी

कालचूक लष्करी तळावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हे दोन ड्रोन घिरट्या घालत होते. त्यावेळी लष्कराने तातडीने प्रत्युत्तर देत हवेत फायरिंगला सुरुवात केली. यानंतर ड्रोन गायब झाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी