शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 13:24 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Asaduddin Owaisi)

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अशात लसीकरणाला (Vaccination)  महामारीवरील परिणामकारक शस्त्र मानले जात आहे. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. मात्र, लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे, असेही ओवैसी म्हणाले.

Coronavirus: साथीला रोखण्यासाठी मोदी सरकारकडे रणनीतीच नाही, राहुल गांधी यांचा घणाघात

एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "खोटं, खोटं आणि खोटं. मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे. पंतप्रधान ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा. आपल्या महालातून बाहेर येऊन पाहा, देशातील गरीबांची काय परिस्थिती आहे."

ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल - भारतात कोरोनाविरोधात लसीकरण अभियान सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत करोरोना लसीचे 20,89,02,445 (20 कोटींहून अधिक) लशी दिल्या गेल्या आहेत. तर गेल्या 24 तासांत 30,62,747 डोसे देण्यात आले आहेत.

"...पण मोदी सरकारला काळजीच नाही!" राहुल गांधींनी सांगितली कोरोनाला कंट्रोलमध्ये आणायची 'की'

लशीसंदर्भात राहुल गांधींचाही मोदींवर निशाणा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरत, राहुल गांधी म्हणाले. कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही. तिचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोना लस देण्यात आपण जितका उशीर करू तितके या विषाणूची नवनवीन उत्परिवर्तने व प्रकार अस्तित्वात येऊन माणसांवर हल्ला करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही भीती आहे. कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत असतो.  राहुल गांधी यांनी सांगितले की, कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो, पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

तसेच, जगातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लशी तयार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लशी भारतात शक्य तितक्या लवकर आणाव्यात, असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या