शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"...मग काय घालायचं? बिकनी?; एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला PM व्हावी, हे माझं स्वप्न"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 15:20 IST

  'मी जेव्हा बोलतो, की एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला या देशाची पंतप्रधान व्हावी, तेव्हा अनेकांच्या डोक्यात आणि पोटात दुखायला लागते. मी असे का म्हणून नेय? हे माझे स्वप्न आहे. यात चूक काय?

कर्नाटकातील शालेय संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांचे एकमत झालेले नाही. यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडून केली जाणार आहे. यातच हिजाबवरून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'मी जेव्हा बोलतो, की एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला या देशाची पंतप्रधान व्हावी, तेव्हा अनेकांच्या डोक्यात आणि पोटात दुखायला लागते. मी असे का म्हणून नेय? हे माझे स्वप्न आहे. यात चूक काय? पण तुम्ही म्हणता, की कुणीही हिजाब परिधान करू नये. मग काय घालायला हवे? बिकनी? आपल्याकडे तीही घालण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मुलीने हिजाब परिधान करू नये आणि मी दाढी कापावी, अशी आपली इच्छा का?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

आम्ही मुलींवर दबाव टाकतो का? ओवेसींचा सवाल - ओवेसी म्हणाले, मुस्लीम मुलीने हिजाब घातला, तर तिची बुद्धीमत्ता कमी आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही आमच्या लहान मुलींना हिजाब घालण्याचा दबाव टाकतो का? आम्ही खरंच मुलींना बळजबरी करतो का? आमच्यावर आरोप केला जातो, की आम्ही मुलींवर दबाव टाकतो. खरे तर, आजकाल कोण कुणाला घाबरतो? यावेळी त्यांनी हिजाबची तुलना पुन्हा एकदा हिंदू, शिख आणि ख्रिश्चन प्रतिकांशी केली. 

ते म्हणाले, जर हिंदू, शिख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिकांसह प्रवेश दिला जातो, तर मग मुस्लिमांनाच का रोखले जाते. असे झाले, तर ते लोक मुस्लीम समाजाच्या बाबतीत काय विचार करतील. त्यांना तर असाच  मेसेज जाईल, की मुस्लीम आपल्या पेक्षा खालच्या पातळीचे आहेत. यावर भाजप नेत्ये सीटी रवी म्हणाले, ओवेसी हे अतिरेकाचे समर्थन करतात, हे भारतात चालणार नाही.भाजपने लादेन आणि तालिबानचा उल्लेख करत घेरले - सीटी रवी म्हणाले, 'मला ओवेसींना विचारायचे आहे, की तुम्ही कुराणाच्या नावावर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तालिबानला पाठिंबा देता का? अल्लाहच्या नावाने दहशतवाद वाढवणाऱ्या लादेनचे तुम्ही समर्थन करता का? एवढेच नाही तर बहुतांश लोक अल्लाहच्या नावाने दहशतवाद वाढवत आहेत, पण भारतात याला परवानगी दिली जाणार नाही.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाCourtन्यायालय