शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीआय’मधील खात्यातून ‘एम्स’चे १२ कोटी पळविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:27 IST

हा घोटाळा मागील एक महिन्याच्या अवधीत घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : बँकांमधील घोटाळे आणि गैरव्यवस्थापनाचा फटका देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था ‘एम्स’लाही बसला आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधील ‘एम्स’च्या दोन बँक खात्यांतून बनावट धनादेशांच्या (क्लोन्ड चेक) माध्यमातून तब्बल १२ कोटी रुपये लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा घोटाळा मागील एक महिन्याच्या अवधीत घडल्याचे सूत्रांनी सांगितले.१२ कोटी रुपये लंपास झाल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर गेल्याच आठवड्यात एसबीआयच्या देहरादून आणि मुंबईतील शाखेतून आणखी २९ कोटी रुपये बनावट धनादेशांच्या माध्यमातून पळविण्याचा प्रयत्न भामट्यांनी केला. रुग्णालयाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर घोटाळेखोरांनी एसबीआयच्या देहरादून शाखेतून २० कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंबईतील शाखेतूनही ९ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.‘यूव्ही रे टेस्ट’मध्ये हे चेक उत्तीर्णएका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या बनावट धनादेशांचा वापर करून भामट्यांनी पैसे लंपास केले, ते बनावट असल्याचे बँकेच्या पडताळणी यंत्रणेला ओळखता आले नाही. ‘यूव्ही रे टेस्ट’मध्ये हे चेक उत्तीर्ण झाले. भामट्यांनी पैसे काढण्यासाठी वापरलेल्या क्रमांकाचे मूळ धनादेश अजूनही एम्सकडे आहेत. याची माहिती एम्सने आरोग्य मंत्रालयाला दिली आहे. बाहेरच्या शाखेतील धनादेश वटविताना धनादेशांची पडताळणी करण्याची पद्धती एसबीआयने नीट वापरली नाही. त्यामुळे हा घोटाळा झाला आहे. बँकेच्या चुकीमुळे हा घोटाळा झाल्यामुळे चोरीला गेलेले आपले पैसे बँकेने आपल्या खात्यावर जमा करावेत, असे एम्सने म्हटले आहे.

टॅग्स :SBIएसबीआय