शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : म्हणून राज्यसभेत ढसाढसा रडले हे खासदार महोदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:55 IST

आज राज्यसभेमध्ये कामकाज सुरू असताना अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मिरप्रश्नी मध्यस्थीच्या केलेल्या दाव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज जोरदार गोंधळ झाला. दरम्यान, राज्यसभेमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले. त्याचे झाले असे की आज राज्यसभेमध्ये काही खासदारांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त देण्यात येणाऱ्या निरोपाच्या भाषणादरम्यान एआयएडीएमकेचे खासदार वासुदेवन मैत्रेयन गहिवरले आणि यांच्या डोळ्यात पाणी आले. आपले निधन झाल्यानंतर सभागृहाने शोक पाळू नये असेही, आवाहन त्यांनी केले. त्यामुळे सभागृहातील वातावरणही भावूक झाले. एआयएडीएमकेचे खासदार वासुदेवन मैत्रेयन हे जेव्हा आपल्या निरोपाच्या भाषणासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर ते भावूक झाले आणि सभागृहामध्येच त्यांना रडू कोसळले. यादरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच निकटचे मित्र अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.   '2009 मध्ये जेव्हा श्रीलंकेमध्ये अनेक तामिळी व्यक्तींची हत्या झाली त्यावेळी राज्यसभेत शोक व्यक्त करण्यात आला नव्हता. या प्रकारामुळे मला खूप दु:ख झाले होते. त्यामुळे जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा या सभागृहात माझ्या मृत्युबाबत शोकप्रस्ताव सादर करू नये, असे आवाहन मी सभागृहाला करतो,' असे त्यांनी सांगितले.  यावेळी मैत्रेयन यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले. तसेच विविध पक्षांच्या ज्येष्ठ खासदारांचेही आभार मानले. तसेच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचीही आठवण काढली. बुधवारी राज्यसभेतील एकूण पाच खासदारांचा शेवटचा दिवस होता. यामध्ये डी. राजा. व्ही मैत्रेयन, के. आर. अर्जुन, आर. लक्ष्मण, टी. रत्नवेल यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमPoliticsराजकारण