शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

सासरच्यांचा कट आणि न्यायासाठी शेवटची हाक;९० मिनिटांच्या व्हिडीओनंतर इंजिनिअरने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:14 IST

बंगळुरुमधील एका इंजिनियरच्या मृत्यूनंतर देशभरात आता पुरुषांच्या हक्कांवर वादविवाद सुरू झाला आहे

Techie Atul Subhash Death: बंगळुरूमध्ये एका एआय इंजिनिअरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. ९ डिसेंबर रोजी ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी ९० मिनिटांचा व्हिडिओ आणि २४ पानांचे एक पत्र समोर आणत आत्महत्या केली होती. माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असं सुभाष यांनी म्हटलं होतं. सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानिया, सासू, भावजय आणि चुलत सासरे यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. तसेच अतुलने उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका न्यायाधीशावरही गंभीर आरोप केले आहेत. खटला बंद करण्याच्या नावाखाली न्यायाधीशांनी ५ लाख रुपये मागितल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

अतुल सुभाषच्या आत्महत्येने देशभरात प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अतुलच्या कुटुंबाचा आरोप आहे की भारतीय कायदे स्त्रियांच्या बाजूने झुकलेले आहेत आणि पुरुषांसाठी कमी आहेत. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही न्याय मागितला आहे. अतुल सुभाष हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होता. त्याच्या घरी २४ पानांची सुसाईड नोट आढळली असून त्याने स्वतःचा जीव घेण्यापूर्वी ९० मिनिटांचा व्हिडिओ देखील शूट केला होता. ज्यामध्ये त्याने त्याच्या विभक्त पत्नीने खोटे आरोप लावले, त्याचा छळ केला आणि अनेक खटले दाखल केल्याचा आरोप केला आहे.

अतुल सुभाषने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने अनेक गुन्हे दाखल केले आहेत आणि आता ती ३ कोटींची मागणी करत आहे. आत्महत्येच्या वेळी अतुलने घातलेल्या टी-शर्टवर जस्टिस इज ड्यू असे लिहिले होते. २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या २ वर्षानंतर पत्नीने अतुलविरोधात हुंड्यासाठी छळ, खुनापासून अनैसर्गिक लैंगिक शोषणापर्यंतचे गुन्हे दाखल केले. पत्नीने तीन कोटी रुपये पोटगी मागितल्याचा आरोप अतुलने केला आहे. मला माझ्या मुलाचा चेहराही पाहू दिला नाही. लग्नानंतर पत्नीच्या वडिलांचा आजारपणात मृत्यू झाला मात्र सासरच्यांनी माझ्याविरोधात खुनाचा एफआयआर दाखल केला, असंही अतुलने म्हटलं आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. 2 वर्षांत मला १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावे लागल्याचा दावा अतुलने केला आहे. न्यायाधीशांसमोरच पत्नीने मला आत्महत्या का केली नाही असे विचारले होते आणि हे ऐकून न्यायाधीश जोरजोरात हसायला लागल्याचा दावा अतुलने केला.

मृत्यूपूर्वी अतुलने त्याच्या मुलासाठी भेटवस्तू ठेवली आहे. जी त्याला २०३८ मध्ये १८ वर्षांचा झाल्यावर उघडायला सांगितली आहे. या वादात अतुलच्या सासरच्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये,"मला वाटते की मी आत्महत्या करावी कारण मी कमावत असलेल्या पैशाने माझे शत्रू मजबूत होत आहेत.याचा वापर मला नष्ट करण्यासाठी केला जाईल आणि हे चालूच राहील. माझ्या टॅक्सच्या पैशाने ही न्यायालय आणि पोलिस यंत्रणा मला, माझ्या कुटुंबाला आणि इतर चांगल्या लोकांना त्रास देईल," असं अतुल सुभाष म्हणताना दिसत आहे. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी