शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलरचा फटका; इंटरपोलचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:48 IST

फ्रान्समधील ल्योन येथे मुख्यालय असलेल्या ‘इंटरपोल’ या जागतिक पोलिस सहकार्य संघटनेने आपल्या ‘२०२६ जागतिक आर्थिक फसवणुकीच्या धोक्याचे मूल्यांकन अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाने आता एका भीषण संकटाचे रूप धारण केले असून, गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल ४४२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. फ्रान्समधील ल्योन येथे मुख्यालय असलेल्या ‘इंटरपोल’ या जागतिक पोलिस सहकार्य संघटनेने आपल्या ‘२०२६ जागतिक आर्थिक फसवणुकीच्या धोक्याचे मूल्यांकन अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे.इंटरपोलने या फसवणुकीच्या जागतिक जोखमीला ‘उच्च’ श्रेणीमध्ये ठेवले असून, सायबर गुन्हेगार आता केवळ सामान्य तंत्रज्ञानच नव्हे, तर ‘एजेंटिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची भीती व्यक्त केली आहे. 

४.५ पटीने धोकादायक‘एजेंटिक एआय’ हे तंत्रज्ञान पारंपरिक फसवणुकीच्या पद्धतींपेक्षा ४.५ पटीने अधिक धोकादायक आहे. हे तंत्रज्ञान स्वतःहून संपूर्ण फसवणुकीचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासही सक्षम आहे. माहिती काढण्यापासून ते रॅन्समवेअरद्वारे खंडणी मागेपर्यंतची सर्व कामे हे एआय सिस्टिम मानवी हस्तक्षेपाशिवाय करू शकते.

‘फ्रॉड एज ए सर्विस’चा धोकाबाजारात आता ‘फ्रॉड-एज-ए-सर्विस’ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत. यामुळे ज्यांना तांत्रिक कौशल्य येत नाही, असे कमी अनुभवी लोकही मोठ्या प्रमाणावर आणि आर्थिक फसवणूक करू शकतात. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने खोटे आवाज, व्हिडीओ आणि मेसेजेस तयार करून सर्वसामान्य नागरिक आणि कंपन्यांची फसवणूक केली जात आहे.

गुन्हेगारीचे नवे ‘नेटवर्क’ : रिपोर्टनुसार, आता गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. मादक पदार्थांची तस्करी करणारे जुने गुन्हेगारी गट आता इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान-समर्थित फसवणुकीच्या व्यवसायात उतरले आहेत. अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर फसवणूक आता एकमेकांशी जोडली गेली असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AI-Fueled Fraud Costs Global Economy $442 Billion: Interpol Warning

Web Summary : Global economic fraud, boosted by AI, cost $442 billion. Interpol warns of 'Fraud-as-a-Service' & AI creating sophisticated scams, linking drug cartels to cybercrime, posing significant challenge to law enforcement.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स